22 January 2021

News Flash

भारतीय लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानाला झापलं: “जग करोनाशी लढतंय अन् तुम्ही दहशतवाद निर्यात करण्यात दंग”

भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला झापलं आहे

भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला झापलं आहे. आज भारत आणि संपूर्ण जग करोनाशी लढत असताना पाकिस्तान मात्र दहशतवाद निर्यात करण्यात व्यस्त आहे अशा शब्दांत मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. “आम्ही आमच्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहोत. फक्त आमच्या लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण दुसरीकडे पाकिस्तान मात्र फक्त दहशतवाद निर्यात करत आहे. हे योग्य नाही,” असं लष्कर प्रमुखांनी म्हटलं आहे.

लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “संपूर्ण जग आणि भारत आज करोनाशी लढा देत असताना आपला शेजारी देश अद्यापही आपल्याला त्रास देण्यात व्यस्त आहे ही दुर्दैवी बाब आहे”. सीमारेषेवर गेल्या काही दिवसात अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.

 

नुकतंच भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दुधनियाल परिसरातील दहशतवादी लाँचपॅडवर स्ट्राइक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं. पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये वारंवार होणारा घुसखोरीचा प्रयत्न आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळेच भारतीय लष्कराकडून हे ऑपरेशन करण्यात आलं. भारतीय लष्कराने १ एप्रिल रोजी केरन सेक्टरमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांनी ठार केलं होतं. या दहशतवाद्यांनी ज्या लाँचपॅडचा वापर केला होता तेच भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आलं.

लष्करातील आठ जणांना करोनाची लागण
“भारतीय लष्करातील आठ जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. यामधील दोन डॉक्टर आणि एक नर्सिंग असिस्टंट आहे. इतर चार रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. याशिवाय एक जण लडाखमधील जवान असून तो पूर्ण बरा झाला असून पुन्हा कर्तव्यासाठी हजर झाला आहे,” अशी माहिती यावेळी लष्कर प्रमुखांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “जे जवान करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेले नाहीत त्यांनी पुन्हा युनिटमध्ये पाठवलं जात आहे. जवानांसाठी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन ट्रेन बंगळुरु ते जम्मू आणि बंगळुरु ते गुवाहाटी या मार्गावर धावणार आहेत”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:56 pm

Web Title: coronavirus pakistan busy exporting terror indian army chief gen naravane sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “आलू एक दर्जन, दयालु दो दर्जन”; परेश रावल यांची भाजपाच्याच नेत्यावर टीका
2 केंद्र सरकारचा राज्यांशी संवाद नाही; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा गौप्यस्फोट
3 Coronavirus: सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी…थाटामाटात पार पडला माजी पंतप्रधानांच्या नातवाचा विवाहसोहळा
Just Now!
X