27 September 2020

News Flash

Coronavirus: पाकिस्तानात लॉकडाउन करु शकत नाही – इम्रान खान

करोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना अनेक देशांनी लढा देण्यासाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे

करोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना अनेक देशांनी लढा देण्यासाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे. पाकिस्तानाही करोनाने शिरकाव केला असून लॉकडाउन केलं जावं अशी मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं आहे. देशातील एक तृतीयांश जनता दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीवर आपलं पोट भरत असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

“पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत,” असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.

“आम्ही आमच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, अलगीकरण आणि विलगीकरण यांचा सराव करत आपली आणि इतरांची सुरक्षा करणंही गरजेचं आहे,” असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांनी यावेळी कोणतीही भीती पसरवू नका असं आवाहन केलं आहे.

“घाबरण्याची गरज नाही अन्यथा गोंधळ निर्माण होऊ शकतो. लोक धावपळ सुरु करतील आणि धान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. याचे परिणाम खूप भयंकर असती. या संकटातून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती इम्रान खान यांनी दिली आहे.

शनिवारी सिंध प्रांतात ४१ नवी प्रकरणं समोर आली. यामुळे तेथील करोनाग्रस्तांचा आकडा ३३३ वर पोहोचला. तर एकूण पाकिस्तानात करोनाची लागण झालेल्यांची संख्या ६८६ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 12:26 pm

Web Title: coronavirus pakistan pm imran khan on lockdown sgy 87
Next Stories
1 हिमाचल प्रदेशमध्ये लॉकडाउनची घोषणा
2 भिती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखी स्थिती निर्माण केली, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
3 आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा; केंद्राचे राज्य सरकारांना आदेश
Just Now!
X