एकीकडे करोनाने जगभरात थैमान घातला असताना प्रत्येक देश आपापल्या परिने त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक देश लवकरात लवकर करोनावरील लस उपलब्ध व्हावी यासाठी संशोधन तसंच मानवी चाचणी करत आहे. मात्र दुसरीकडे पाकिस्तान मात्र करोना संकटावरुनही भारतावर निशाणा साधताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील करोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगताना भारताचा उल्लेख केला आहे.

इम्रान खान यांनी ट्विट केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, “पाकिस्तान त्या सुदैवी देशांपैकी एक आहे जिथे रुग्णालयांमधील करोना रुग्ण, खासकरुन आयसीयूमधील आणि मृत्यू दर कमी होत चालला आहे”. यावेळी इम्रान खान यांनी आपल्या दुर्दैवी शेजारी भारताच्या विपरित असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “आपलं लॉकडाउन धोरण आणि लोक सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांचं पालन करत असल्याने हा पॉझिटिह ट्रेंड आला आहे”.

“मी देशवासियांना नियमांचं पालन करावं आणि हा ट्रेंड कायम ठेवावा अशी विनंती करतो,” असंही ते म्हणाले आहेत. याशिवाय लोकांना ईद अत्यंत साधेपणाने साजरी करावी असं आवाहनही केलं आहे.

आणखी वाचा- कुलभूषण जाधव यांना भेटण्याची पाकिस्तानकडून तिसऱ्यांदा परवानगी; भारताची अट केली मान्य

आणखी वाचा- भगवान राम नेपाळीच होते हे सिद्ध करण्यासाठी नेपाळने घेतला ‘हा’ निर्णय

“ईद अत्यंत साधेपणाने साजरी करा, गेल्या ईदला ज्या पद्दतीने नियमांचं उल्लंघन झालं आणि रुग्णालयांमध्ये गर्दी झाली त्याची पुनरावृत्ती नको,” असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा आदेश दिला.