04 July 2020

News Flash

Video: …अन् पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिली ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मृत्यूची खोटी बातमी

करोनामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे निधन झाल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवली

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाचा संसर्ग झाल्याने आणि प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. बोरिस यांना गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. स्वतःच विलगीकरण केल्यानंतरही जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं सोमवारी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णालयामध्ये त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पंतप्रधानांच्या प्रवक्तांनी सोमवारी रात्री स्पष्ट केलं आहे. मात्र पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीने खोट्या बीबीसी अकाऊटच्या हवाल्याने बोरिस जॉन्सन यांचे निधन झाल्याचे वृत्त प्रसारित केलं. या बेजबाबदारपणासाठी या वृत्तवाहिनीवर आता टीकेची झोड उठली आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार वझाहत काझमी यांनी या वृत्तांकनाचा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. “डॉन न्यूज या वृत्तवाहिनीने आज ब्रिटने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे करोनामुळे निधन झाल्याचे वृत्त ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसारित केलं. त्यांनी हे वृत्त देताना बीबीसी वर्ल्डच्या खोट्या ट्विटर अकाऊंटचा संदर्भ दिला. या अकाऊंटला अवघे काही शे फॉलोअर्स आहेत,” असं काझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये ‘करोना व्हायरस के कारण ब्रिटन के वझीरे आझम बोरिस जॉन्सन इंतकाल हो गये है,’ असं बातम्या वाचणारी वृत्तनिवेदिका सांगताना दिसत आहे.

नक्की पाहा >> Video: ‘त्या’ एका चुकीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांना झाला करोना?

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी स्वतःला विलग करून घेतलं आहे. तेथूनच ते संपूर्ण काम करत होते. मात्र, ताप कमी होत नसल्यानं त्यांना सोमवारी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपचार सुरू असताना जॉन्सन यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाली. त्यामुळे त्यांना तातडीनं अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. जॉन्सन यांच्यावर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.

भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयातील प्रवक्त्यांनी जॉन्सन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली नाही. तसेच सरकार सध्या जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या योजनेनुसारच करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 11:16 am

Web Title: coronavirus pakistani news tv aired news of british prime minister boris johnson death due to covid 19 scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 अचानक ट्रम्प यांची भूमिका बदलली, मोदी महान नेते, भारतावर कौतुकाचा वर्षाव
2 Coronavirus Timeline: तीन महिन्यांत कसं बदललं जग
3 २५ दिवस दरी खोऱ्यांमध्ये फिरायला गेले होते परत आल्यावर जगभारतील करोना थैमानाबद्दल समजलं अन्…
Just Now!
X