News Flash

Coronavirus: उपचारसाठी काढलं ३५ लाखांचं कर्ज; वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण पगार जातोय EMI मध्ये

रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक फसवणूक करु नये म्हणून सरकारने धोरण तयार करावं अशी मागणी आता ते करत असून आपल्याप्रमाणे इतरांची फसवणूक होऊ नये असं त्यांना वाटतं

४० दिवस ते गांधीनगरमधील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : रॉयटर्स)

करोना संकटाच्या कालावधीमध्ये रुग्णालयांमधील महागाड्या उपचारांबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. आपल्या जिवलगांना वाचवण्यासाठी अनेकजण जीवाचं रान करताना दिसत आहेत. मात्र या करोना संकटाच्या काळामध्येही अनेक ठिकाणी रुग्णालयांकडून अधिक पैसे घेण्यासंदर्भातील धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. असाच एक प्रकार गांधीनगरमध्ये राहणाऱ्या राजन भलाणी यांच्यासोबत घडलाय. राजन यांच्या वडिलांचं करोना उपचारादरम्यान निधन झालं. मात्र आजही वडिलांच्या आठवणीने राजन यांचे डोळे पाणावतात.

राजन भलाणी यांचे वडील जयेश यांचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४० दिवस गांधीनगरमधील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जयेश यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र ४० दिवसांनंतरही जयेश यांना वाचवण्यात यश आलं नाही. जयेश यांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने राजन यांच्या हाती दिलेल्या बिलाचा आकडा पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

राजन यांच्या वडिलांना १० दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाने जयेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी दिवसाचे ५० हजार रुपये याप्रमाणे ५ लाख रुपये बील आकारल्याचा दावा आजतकशी बोलताना राजन यांनी केलाय. औषधे आणि इंजेक्शनाच्या नावाने रोजचा खर्च ७५ हजार इतका लावण्यात आलाय. रुग्णालयाचं एकूण बिल १८ लाख रुपये इतकं झालं तर इंजेक्शन आणि बाहेरुन आणण्यात आलेल्या औषधांचे १५ लाख झाल्याचं राजन यांना सांगण्यात आलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

राजन यांना रुग्णालयाकडून रोज बिलाची नवीन आकडेवारी दिली जात होती. मात्र वडिलांचा जीव वाचवण्यासाठी राजन यांनी उपचार सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. रेमडेसिविर, टोसिलोजुम्बे, ब्लड प्लाझमा अशा अनेक गोष्टींची व्यवस्था राजन यांनी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी केली. राजन यांनी वडिलांना वाचवण्यासाठी ओव्हरड्राफ्टवर ३५ लाखांचं कर्ज काढलं. उपाचारांसाठी उधारीवर पैसे घेणाऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी राजन यांनी हे कर्ज काढलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : ५०० रुपयांमध्ये दोन डोस; सर्वात स्वस्त Corbevax लस इतर लसींपेक्षा वेगळी कशी?

मात्र इतके प्रयत्न करुनही राजन यांच्या वडिलांचा जीव वाचला नाही. आज वडिलांच्या निधनानंतर ही परिस्थिती आहे की राजन यांचा संपूर्ण पगार थेट कर्जाचे हफ्ते फेडण्यात म्हणजेच ईएमआयमध्ये जातोय. रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक फसवणूक करु नये म्हणून सरकारने धोरण तयार करावं अशी मागणी राजन करत आहेत. आपल्याप्रमाणे इतर रुग्णांच्या नातेवाईकांना एवढा मोठा आर्थिक फटका बसू नये, फसवणूक होऊ असं राजन यांना वाटतं. त्यासाठी ते आता रुग्णालयांकडून किती पैसे आणि कशासाठी आकरले जातात याबद्दल स्पष्टता आणण्यासाठी धोरणं आखण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 1:32 pm

Web Title: coronavirus patient son take loan for covid 19 medical bill scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक… ६० हजार लिटरहून अधिक ज्वलनशील Acid कंपन्यांनी नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडलं
2 ‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’! केजरीवाल सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
3 शेतकरी गायीसह पोलीस ठाण्यात हजर, कारण…
Just Now!
X