28 May 2020

News Flash

भारतालाही मिळू शकतं पाच मिनिटात करोना चाचणीचा रिपोर्ट देणारं मशीन

करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढतेय, ते पाहता लवकरात लवकर टेस्टचा रिपोर्ट मिळणे आवश्यक आहे.

जगातील औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी अबॉट लॅबोरेटरीजने करोना व्हायरसच्या चाचणीसाठी पोर्टेबल उपकरण बनवलं आहे. हे उपकरण घशातील नमुने चाचणीसाठी घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट देते. सध्या जगभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढतेय, ते पाहता लवकरात लवकर टेस्टचा रिपोर्ट मिळणे आवश्यक आहे. तरच या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवता येईल.

जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे उपकरण पोहोचवण्याचा अबॉटचा प्रयत्न आहे. हे पोर्टेबल उपकरण चाचणीसाठी भारतात उपलब्ध होणार का? असा प्रश्न इंडियन एक्स्प्रेसने अबॉटला विचारला. त्यावर कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले कि, “अबॉटच्या सर्व प्रयोगशाळांमध्ये करोनाची चाचणी करणारे हे पोर्टेबल उपकरण आम्ही तयार करत आहोत. जगातील जास्तीत जास्त लोकांना उपयोगी ठरणारे हे उपकरण उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. २४ तास आमचे उत्पादन सुरु आहे. उत्पादनाची क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे”

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने इमर्जन्सीमध्ये मंजुरी दिल्याचे अबॉट लॅबोरेटरीजने म्हटले आहे. छोटया टोस्टरच्या आकाराचे हे मशीन आहे. मॉलीक्युलर टेक्नोलॉजीचा त्यामध्ये वापर करण्यात आला आहे. एखादा रुग्ण निगेटिव्ह असेल तर १३ मिनिटात कळते असे कंपनीने पत्रकात म्हटले आहे.

“COVID-19 विरोधात वेगवेगळया आघाडयांवर लढाई सुरु आहे. पोर्टेबेल मॉलिक्युलर टेस्टमुळे अवघ्या काही मिनिटात रिझल्ट मिळतो” असे अबॉटचे अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी रॉबर्ट फोर्ड यांनी सांगितले. छोटया आकारमानामुळे हॉस्पिटल बाहेरही करोना व्हायरसची चाचणी सहज शक्य आहे” असे फोर्ड म्हणाले.

अमेरिकेत सर्वाधिक गरज असलेल्या भागांमध्ये हे मशीन पाठवण्यात येईल. पोर्टेबेल मॉलिक्युलर टेस्टमशीनला अद्याप एफडीएकडून मान्यता मिळालेला नाही फक्त मान्यताप्राप्त लॅबना इमर्जन्सीमध्ये हे मशीन वापरण्याची परवानगी आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 5:57 pm

Web Title: coronavirus pharma giant readies five minute test may bring it to india too dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 लाल चिखल! …म्हणून त्या शेतकऱ्याने तीन हजार किलो टोमॅटो तळ्याकाठी फेकून दिले
2 Coronavirus: १७५ जणांची चाचणी, २००० लोक क्वारंटाइन; दिल्लीतील निजामुद्दीन परिसर सील
3 “सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के रिटेल दुकानं होतील बंद”
Just Now!
X