27 February 2021

News Flash

पाकिस्तानात करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला २४५, कर्जासाठी वर्ल्ड बँकेकडे पसरले हात

पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये करोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २४५ पर्यंत पोहोचली आहे. त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेने संकटाचे गांर्भीय ओळखून स्वत:ला बंद केले आहे. श्रीलंकेने शेअर बाजारही बुधवारी बंद ठेवला. भारतीय उपखंडात करोना बाधितांची संख्या ४८२ पर्यंत पोहोचली आहे.

अनेक देशांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणले आहेत. जगभरात आतापर्यंत दोन लाख लोकांना करोनाची लागण झाली असून, आठ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. “शांतता पाळा, करोनाची चाचणी करण्याची घाई करु नका. अमेरिकेकडे सुद्धा प्रत्येकाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ज्यांना तीव्र लक्षणे दिसतायत, त्यांनीच रुग्णालयात जावे. घाबरण्याची गरज नाही. आपण सर्व मिळून करोनाशी लढा देऊ. आपण ही लढाई जिंकू” असे इम्रान खान म्हणाले.

करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानला अचूक निदान आणि रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तात्काळ २० कोटी डॉलरचे कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानची वर्ल्डबँकबरोबर बोलणी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 3:42 pm

Web Title: coronavirus positive cases surge to 245 in pakistan dmp 82
Next Stories
1 Coronavirus: वीजबिलं नंतर भरा, वीज कापली जाणार नाही; प्रशासानाकडून ग्राहकांना दिलासा
2 Coronavirus: वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती; आंतरराज्यीय बस सेवेवर निर्बंध
3 Coronavirus : वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती
Just Now!
X