News Flash

गरजू व्यक्तींना अन्नदान करताना सेल्फी किंवा फोटा काढल्यास तुरुंगात जाल

जिल्हाधिकाऱ्यांनीच जारी केला आदेश, दोषी ठरल्यास सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा

प्रातिनिधिक फोटो (फोट : प्रशांत नाडकर)

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असणाऱ्या लॉकडाउनदरम्यान अनेक हातावर पोट असणारे कामगार, मजूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. या मजूरांना अन्नदान करण्याचे काम अनेक सेवाभावी संस्था तसेच व्यक्तींच्या माध्यमातून केलं जात आहे. मात्र हे अन्नदान करताना गरजूंबरोबर फोटो काढून ते सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणाऱ्यांचेही प्रमाण खूप आहे. अशाच लोकांविरोधात आता राजस्थान पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आणि सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अनेक फोटो दिसून येत आहे. अडकून पडलेले मजूर, गरीबांना हे लोक अन्नधान्य तसेच जेवणाची पाकिटं वाटताना या फोटोमध्ये दिसून येत आहे. मात्र काही वेळा केवळ फोटो काढण्यासाठी आणि विशिष्ठ उद्देशाने अशा ठिकाणी लोकं जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. म्हणून राजस्थानमधील अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वास मोहन शर्मा यांनी मदतकार्यादरम्यान फोटो काढण्यावर बंदी घातली आहे. गरजू लोकांना अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटे वाटताना फोटो काढणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशापद्धतीने फोटो काढणारे लोकं आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचा पालन न केल्याच्या गुन्ह्याखाली कलम १८८ अंतर्गत सहा महिन्यांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात.

मागील १६ दिवसांमध्ये अनेक सेवाभावी संस्थांनी जागोजागी अडकून पडलेल्या लोकांना अन्नधान्य आणि जेवणाचं वाटप करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आलं आहे. मात्र यापैकी काही लोकं केवळ फोटोंसाठी आणि एखाद्या हेतूने अशा ठिकाणी गोष्टींचे वाटप करत असल्याचे निदर्शनास आलं आहे. अजमेरमध्ये एका ठिकाणी तर आठ जणांनी गरीबांना दोन केळ्यांचे वाटप करतानाचे फोटो पोस्ट केल्याचे प्रकरण समोर आलं आहे. तर अन्य एका घटनेमध्ये अमेरमधून २०१९ साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या रायजू झूनझूनवाला यांच्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गायीला गवत खायला घालतानाचे फोटो काढले. इतकच नाही हे फोटो स्थानिक वृत्तपत्रामध्ये छापून आले होते. त्याचबरोबर काही लोकांना रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्कीटे खाऊ घातल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड केल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

नक्की वाचा >> धक्कादायक! गरीबांच्या अन्नावर श्रीमंतांचा डल्ला, घर बसल्या मागवत आहेत फूड पॅकेट

अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकजण अशाप्रकारे फोटो काढताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळेच आता पोलिसांनी यासंदर्भात सूचना जारी केल्या असून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करुन मदतकार्याचे फोटो आणि सेल्फी काढणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 3:42 pm

Web Title: coronavirus rajasthan bans photography during distribution of food packets and ration among the needy scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कधी खिडक्यांतून गप्पा, तर कधी नेटफ्लिक्सची मदत; वाचा करोना फायटर्सच्या गोष्टी
2 पोलिसांच्या सुरक्षेत भाजपा आमदाराचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, गर्दीला समजावलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व
3 लॉकडाउन असूनही प्रियकराशी लग्न करण्यासाठी ६० किमी चालत आली प्रेयसी
Just Now!
X