News Flash

“अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास करोना नष्ट होईल”; सपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

सरकारकडे नमाज पठणासाठी परवानगी दिली नाही, या चुकींमुळेच आज अनेक संकट येत असल्याचा विचित्र दावा त्यांनी केला असून असा दावा करणारे हे सपाचे दुसरे खासदार

सरकारने प्रार्थनेसाठी परवानगी दिली नाही, असा आरोप त्यांनी केलाय (फोटो सौजन्य: पीटीआय आणि युट्यूब स्क्रीनग्रॅब)

उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी मोदी सरकारला दोष देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या अन्य एका खासदाराने अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. संभलचे समाजवादी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. करोना काही आजार नाहीय. करोना जर आजार असता तर जगात त्यावरील उपाय असता. करोेनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं अजाब ए इलाही (संकट) आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल, असं शफीकुर्र रहमान म्हणालेत.

शफीकुर्र रहमान यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेत. सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलांना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे करोनासारखं आसमानी संकट देशात आलं आहे. मात्र या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी बलात्कारासंदर्भातील आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी मांडल्याचा दावा केलाय. शफीकुर्र रहमान यांनी आधी लस टोचून घेण्यासही विरोध केला होता. मात्र आता त्यांनी लसीकरणासाठी होकार दिलाय.

नक्की वाचा >> बापरे! एकाच रुग्णाला व्हाइट, ब्लॅक, यल्लो फंगसचा संसर्ग; तीन तास सुरु होतं ऑपरेशन

संभल लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदार असणाऱ्या शफीकुर्र रहमान यांनी एस. टी. हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करताना मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. भाजपा सरकारने सात वर्षाच्या कार्यकाळात शरीयत कायद्यामध्ये छेडछाड केल्याने करोनाची महासाथ आणि चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटं देशात आल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर शफीकुर्र रहमान यांनी वादात भर टाकणारं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

करोना हा काही आजार नसल्याचं मी मागील वर्षीच म्हटलं होतं. आजार असता तर त्यावर इलाज असता, पण असं करोनासंदर्भात नाहीय. अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा करोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग असल्याचं शफीकुर्र रहमान म्हणालेत. “आम्ही मुस्लिमांना मशीदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत,” असंही शफीकुर्र रहमान म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 10:41 am

Web Title: coronavirus sambhal sp mp shafiqur rahman barq controversial statement scsg 91
Next Stories
1 बापरे! एकाच रुग्णाला व्हाइट, ब्लॅक, यल्लो फंगसचा संसर्ग; तीन तास सुरु होतं ऑपरेशन
2 अरविंद केजरीवाल म्हणजे आरएसएस-भाजपाची बी टीम; आमदाराचे गंभीर आरोप
3 व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; समोर आलं चीन कनेक्शन
Just Now!
X