News Flash

Coronavirus : काहीसा दिलासा! रुग्णवाढीत घसरण पण, मृतांची संख्या चिंताजनक

देशातील रुग्णसंख्या ४३ लाखांच्या उंबरठ्यावर

संग्रहित (एक्स्प्रेस फोटो - निर्मल हरिंद्रन)

गेल्या काही दिवसांपासून दररोज विक्रमी उच्चांक नोंदवले जात असलेल्या करोना रुग्णसंख्येत सोमवारी काहीशी घट झाली. मात्र, देशभरात झालेल्या मृत्यूच्या आकड्यांनी चिंतेची तीव्रता कमी होऊ दिलेली नाही. देशात गेल्या २४ तासात ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ४३ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर २४ तासात १ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासात आढळून आलेल्या रुग्णांची व मृतांची माहिती जाहीर केली. मंत्रालयानं दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासात देशात ७५ हजार ८०९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या ४२ लाख ८० हजार ४२३ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ८३ हजार ६९७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ३३ लाख २३ हजार ९५१ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत असून, ७२ हजार ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज १ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. या आकड्यात घसरण होण्याऐवजी वाढच होत असल्यानं काळजीत भर पडली आहे.

देशात निर्बंध शिथिल करण्यात आल्यापासून करोनाचा प्रसार वाढल्याचं समोर येणाऱ्या आकडेवारीतून दिसत आहे. गेल्या काही दिवसात देशात दिवसाला ८० ते ९० हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत आहे. मागील दोन तीन दिवसांत ही संख्या कायम होती. मात्र, गेल्या २४ तास मोठी घसरण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 9:59 am

Web Title: coronavirus single day spike of 75809 new covid19 cases in india bmh 90
Next Stories
1 लॉकडाउननंतर तिरुपती मंदिरात भाविकांकडून पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल ‘इतकं’ दान !
2 मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांना दौरा रद्द करायला सांगावं; चीनप्रश्नी स्वामी यांचा पंतप्रधानांना सल्ला
3 “अयोध्येप्रमाणेच आता मथुरा आणि वाराणसीतील मंदिरांसाठी लढा देणार”
Just Now!
X