News Flash

माणुसकीच्या डोळ्यात पाणी! …अन् तो तीन दिवस उड्डाणपुलाखाली रडत होता; त्या मजुराची हृदयद्रावक कहाणी

तो पोलिसांकडे सतत विनंती करत होता मात्र...

Ram Pukar Pandit had received a call from his wife that his one-year-old son had died on Monday. (Photo: Atul Yadav/PTI)

दिवसोंदिवस देशामध्ये वाढत असणाऱ्या करोनाग्रस्तांच्या आकड्यामुळे स्थलांतरित मजुरांसमोरील संकट दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने अनेक राज्यांमध्ये या मजुरांना प्रवेश करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक मजुरांना आपत्कालीन परिस्थितीमध्येही स्वगृही परतता येत नाहीय. अशाच एका मजुरासंदर्भातील हृदयद्रावक परिस्थिती समोर आली आहे. दिल्लीत काम करणाऱ्या पण मूळ बिहारमधील असणाऱ्या राम पुकार पंडीत याला आपल्या मुलाच्या अंत्यदर्शनासाठीही जाता आले नाही. आपल्या एका वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची बातमी राम पुकार याला त्याच्या पत्नीने सोमवारी (११ मे २०२०) फोनवरुन दिली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून राम पुकारला दुख: अनावर झाले. त्याने आहे त्या परिस्थितीमध्ये मुलाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चालतच बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी त्याला अडवल्याने स्वत:च्या मुलाचे अंत्यदर्शन त्याला करता आले नाही. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

याच राम पुकारचा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये राम पुकार मोबाइलवर बोलताना रडत असल्याचे दिसत आहे. दिल्लीवरुन निघाल्यानंतर पोलिसांनी आपल्याला युपी गेटजवळ अडवले आणि आपल्या घरची परिस्थिती सांगितल्यानंतरही पोलिसांनी मला जाऊ दिले नाही असा आरोप राम पुकारने केला आहे. मात्र बिहराला जायचेच असल्याने राम पुकारने गाजीपूर उड्डाणपुलाखाली थांबून तीन दिवस काढले. या तीन दिवसांदरम्यान तेथे येणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्याला राम पुकार आपल्या घरी घडलेला प्रकार सांगून बिहारला जाण्याची परवानगी देण्याची विनंती करत होता. मात्र कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तिन दिवस राम पुकारने केवळ पोलिसांना विनंती करत रडत रडत उड्डाणपुलाखाली बसून काढले.

तीन दिवस उड्डाणपुलाखाली वास्तव्यास असताना काही सेवाभावी संस्था आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी राम पुकारला खाण्यासाठी अन्नपदार्थ दिले. तीन दिवस राम पुकार उड्डाणपुलाखालीच थांबल्याचे पाहून पोलिसांनी अखेर त्याला दिल्ली रेल्वे स्थानकावर नेऊ सोडले आणि तिथून बिहारला जाणाऱ्या श्रमीक विशेष ट्रेनमध्ये बसवले आणि बिहारकडे रवाना केले. राम पुकारला आता बेगुलसुरायमधील एका शाळेमध्ये आरोग्य तपासणी आणि क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

लवकरच आपली कुटुंबाबरोबर भेट होईल अशी अपेक्षा राम पुकारला आहे. मात्र उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सिमेवर पोलिसांबरोबर झालेला संघर्ष राम पुकार विसरु शकला नाही. राम पुकारच्या मुलावर त्याच्या अनुपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने त्याला आपल्या मुलाचे अंत्यदर्शनही करता आले नाही. क्वारंटाइनमध्येही कुटुंबाच्या आठवणीमुळे राम पुकार सतत रडत असतो. तर दुसकीडे त्याची पत्नी आणि तीन मुली तो घरी येण्याची वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:44 pm

Web Title: coronavirus story of migrant labour ram pukar who lost his son in bihar but unable to travel as police stopped him at up delhi border scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी क्वारंटाइनमधून पळाला, घरी पोहोचला आणि…
2 काश्मिरी जनतेचं दुःख समजायला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदी
3 “ही आपलीच माणसं आहेत”; भाजपाच्या खासदारानेच अमित शाह यांना करुन दिली आठवण
Just Now!
X