देशामध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊन करोनाचा संसर्ग होऊ नये या उद्देशाने सरकारी यंत्रणांमार्फतही एकत्र न मजण्याचं आवाहन केलं जात आहे. असतानाचा तेलंगणामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आलेल्या मुस्लीमांनी क्वारंटाइन केंद्रामध्येच एकत्र येत नमाज पठण केल्याची माहिती समोर आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील काही जणांना हैदराबादमधील गांधी रुग्णालयामध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या लोकांनी याच क्वारंटाइन वॉर्डमध्ये एकत्र नमाज पठण केलं.

काही दिवसांपुर्वी दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या तेलंगणामधील सहा जणांचा करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार यापैकी दोघांचा मृत्यू गांधी रुग्णालयामध्ये झाला होता. दोघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांमध्ये, एकाचा निजामाबादमध्ये तर एकाचा गडवाल शहरामध्ये मृत्यू झाला होता. तेलंगणमध्ये आतापर्यंत १५० हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.