पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  ‘मन की बात’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. “करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो,” असं सांगत दिलगीरी व्यक्त केली. इतकचं नाही तर मोदींनी करोनावर मात करणाऱ्या दोन रुग्णांशी गप्पा मारल्या. हैदराबादमधील रामगप्पा तेजा आणि आग्रा येथील अशोक कपूर हे दोन्ही रुग्ण करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी कपूर कुटुंबातील चक्क सहा जणांना करोनाची लागण झाली होती. मात्र पूर्ण उपचारानंतर हे सहाही जण घरी परतले आहेत असं अशोक कपूर यांनी सांगितलं.

करोनाशी दोन हात करुन त्याला हरवणाऱ्या आणि या संकटावर मात करणाऱ्या काहीजणांशी आपण बोलणार आहोत असं सांगत मोदींनी करोनामधून बरे झालेल्या व्यक्तींशी चर्चा केली. यापैकी आग्रा येथे राहणाऱ्या कपूर कुटुंबाची कहाणी अशोक कपूर यांनी सांगितली.

कोण आहे कपूर कुटुंब आणि कशी केली त्यांनी मात?

आग्रा येथे राहणारे ७३ वर्षीय अशोक कपूर यांच्याबरोबर त्यांची पत्नी, दोन मुले, सून आणि १६ वर्षाच्या नातवाला करोनाची लागण झाली होती. या सहाही जणांवर उपचार करुन त्यांच्या चाचण्या नकारात्मक आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. याबद्दल खुद्द अशोक कपूर यांनीच ‘मन की बात’मध्ये माहिती दिली. “आम्ही बूट बनवण्याच्या उद्योगामध्ये आहोत. त्याचनिमित्ताने माझी दोन मुले आणि जावई एका कार्यक्रमासाठी इटलीला गेले होते. ते परत आले त्यानंतर दिल्ली राहणाऱ्या माझ्या जावयाला ताप आणि सर्दीचा त्रास होऊ लगाला. तो तेथील राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये गेला तर तिथे त्याला करोना झाल्याचे अढळून आलं. त्यानंतर त्याला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. याच रुग्णालयामधून आम्हाला फोन आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर गेलेल्या माझ्या दोन्ही मुलांना चाचणी करण्यास सांगण्यात आले. माझी दोन्ही मुले आग्रा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये चाचणीसाठी गेले. तेव्हा त्यांना करोना झाल्याचे अढळून आले. त्यानंतर आमच्या घरातील इतर सदस्यांना चाचणीसाठी बोलवण्यात आलं. तेव्हा आम्हाला म्हणजेच मी, माझी पत्नी, दोन मुले, सून आणि १६ वर्षाच्या नातवालाही करोना झाल्याचे चाचणीमधून समोर आलं,” असं अशोक यांनी सांगितलं. १६ वर्षाच्या नातावालाही करोना झाल्याचे ऐकल्यानंतर मोदींनी ‘अरे देवा’ अशी प्रतिक्रिया दिली.

“आम्हाला करोना झाल्याचे समजल्यानंतर आम्ही घाबरलो नाही. लवकर कळलं याबद्दल याचं उलटं समाधान वाटलं. त्यानंतर आग्रा जिल्हा रुग्णालयाने आम्हाला दोन रुग्णवाहिकांमधून दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलला पाठवलं. त्यांनी आमच्याकडून रुग्णवाहिकांसाठी एक पैसाही घेतला नाही. आम्ही सफदरजंग हॉस्पिटलला गेलो तेव्हा डॉक्टर प्रवेशद्वाराजवळच उभे होते. त्यांनी आम्हाला आयसोलेशन वॉर्डमध्ये नेलं. तिथे सहा जणांना वेगवेगळं ठेवण्यात आलं.”

आग्रा जिल्हा रुग्णालयामध्ये दोन मुले, बायको, पत्नी, नातू (१६), मी ७३ वर्ष
आम्ही दिल्लीला गेलो. पैसे घेतले नाहीत. तिथे डॉक्टर्सने आम्हाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले. वेगवेगळे ठेवले. तिथे आम्ही चौदा दिवस उपचार घेतले. स्टाफ आणि डॉक्टरांचा सहय्योग चांगला होता. तिथे आम्हाला काहीच अडचण आली नाही,” असं अशोक यांनी मोदींना सांगितलं. तसेच भविष्यात करोनाबद्दलच्या जनजागृतीसाठी काहीही मदत लागल्यास कपूर कुटुंब तयार असल्याचंही अशोक यांनी सांगितलं. तसेच आम्ही राहत असलेल्या कॉलिनीमध्ये करोनाबद्दल भिती बाळगण्याची काही गरज नाही, जा आणि चाचणी करुन घ्या असं सांगत आहोत, अशी माहिती अशोक यांनी मोदींना दिली.

हैदराबादमधील रामगप्पा तेजांनी सांगितली आपली संघर्षकथा…

हैदराबादमधील रामगप्पा तेजा यांनाही दुबईहून आल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावरही उपचार करुन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मोदींशी संवाद साधताना तेजा यांनी, “मी आयटी क्षेत्रात काम करतो. त्याचनिमित्त दुबईला गेलो होतो. तिथून परत आल्यानंतर लक्षणं दिसू लागल्यावर मी रुग्णालयात भरती झालो. या आजाराबद्दल अधिक ठाऊक नसल्याने भिती वाटतं होती. मात्र माझ्यावर डॉक्टरांनी चांगले उपचार केले. पहिले काही दिवस मला पॉलिथीनमध्ये ठेवण्यात आलं होते. तेव्हा खूप भिती वाटली होती. नशिबाने माझ्या कुटुंबातील इतर कोणाला याची लागण झाली नाही. मला घरी सोडण्यात आलं असून आता मला घरीच थांबण्यास सांगण्यात आलं आहे,” असं तेजा यांनी मोदींना सांगितलं. तसेच करोनासंदर्भातील जागृतीसाठी आपण नक्की एक व्हिडिओ तयार करुन त्यामधून आपला अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू अशा शब्द तेजा यांनी मोदींना दिला.