05 June 2020

News Flash

हनिमूनला गेलेलं कपल लॉकडाउनमुळे मालदीवमध्ये अडकून पडलं पण…

२२ मार्चपासून सुरु झालेल्या सहा दिवासांच्या हनिमून ट्रीपनंतर ते परत येणार होते मात्र...

Photo Courtesy: Olivia And Raul De Freitas

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लोकं घरीच आहेत. भारतामध्येही २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा आपण एखाद्या चांगल्या पर्यटस्थळावर असतो तर किती छान झालं असतं अशापद्धतीच्या अनेक चर्चा मागील काही दिवसांमध्ये व्हॉट्सअप झाली आहे. पण असं खरोखरच घडलं आहे हनिमूनला गेलेल्या एक जोडप्याबरोबर. करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हे जोडपं मालदीवमध्ये अडकून पडलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मालदीवने परदेशामध्ये जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. अशीच काहीशी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेची आहे. येथेही प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या दोन्ही देशांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेतील एक नवविवाहित जोडपं मालदीवमधील फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये अडकून पडलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘डेली मेल’ने दिलं आहे. मात्र मालदीवमध्ये अडल्याने हे जोडपं आनंदात असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी डेली मेलशी बोलताना, “हे फक्त ऐकायला बरं वाटतं,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ऑलिव्हीया आणि राऊल डी फ्रेटास या दोघांचे मार्च महिन्यामध्ये लग्न झालं. त्यानंतर हे दोघे हनिमूनसाठी २२ मार्च रोजी हनिमूनला आले होते. सहा दिवसांचं हनिमून पॅकेज संपल्यानंतर ते २८ मार्च रोजी परत जाणार होते. मात्र अचानक करोनामुळे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि हे दोघे तिथेच अडकून पडले. आज या घटनेला दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला असून अद्यापही हे दोघे मालदीवमध्येच आहेत. हनिमूनला निघण्याआधीच त्यांनी त्यांच्या ट्रॅव्हल एजंटकडे करोनामुळे लागू होणाऱ्या निर्बंधांबद्दल चौकशी केली होती. मात्र सहा दिवसांचा दौरा असल्याने इतक्या लवकर निर्बंध येण्याची शक्यता या ट्रॅव्हल एजंटने फेटाळून लावत तुम्हाला मायदेशी परतण्यास कोणताही अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता. तुम्हाला घरी आणण्याची जबाबदारी आमची, तुम्ही हनीमून एन्जॉय करा असं या ट्रॅव्हल एजंटने या जोडप्याला सांगितल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. मात्र या जोडप्याने व्यक्त केलेली भिती खरी ठरली. दोन्ही देशांनी प्रवासावर बंदी घातल्याने हे दोघे मालदीवमध्येच अडकून पडले.

या दोघांनाही त्यांच्या हिनीमूनच्या चौथ्या दिवशी मायदेशातील म्हणजेच दक्षिण आफ्रिकेतील सर्व विमानतळे मध्यरात्रीपासून बंद होणार असल्याची माहिती मिळाली. लॉकडाउनमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र दिलेल्या वेळ मर्यादेत मायदेशी पोहचणे त्यांना शक्य होणार नव्हते. ‘हे जोडपं ज्या बेटावर थांबलं आहे तिथून अर्ध्या तासाच्या स्पीडबोटच्या प्रवासानंतर हे मुख्य बेटावर पोहचले असते. त्यानंतर तेथून पाच तासांच्या विमान प्रवासानंतर कतार विमानतळावर पोहचले असते. तेथे तीन तासांच्या हॉल्टनंतर नऊ तासाच्या विमान प्रवासानंतर त्यांना जोहान्सबर्गला पोहचता आलं असतं. मात्र इतका वेळ त्यांच्या हाती नव्हता. त्यामुळेच त्यांना मालदीवमध्येच रहण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहिला नाही,’ असं पीपलमधील वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

“सर्वांना आपणही अशा एखाद्या बेटावर अडकून पडायला हवं होतं असं वाटू शकतं. मात्र अशा परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर तुम्हाला येथे येणाऱ्या अडचणींची कल्पना येते,” असं शिक्षिका असणारी २७ वर्षीय ऑलिव्हीया सांगते. हे जोडपं ज्या बेटावरील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते तिथे इतर कोणीच पर्यटक नव्हते. त्यामुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी या दोघांसाठीच काम करत होते. दिवसातून पाच वेळा या दोघांना काही हवंय नकोय हे पाहण्यासाठी हॉटेलचा माणूस यायचा. त्यांच्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या जेवणाची आणि विशेष मनोरंजनाची सोयही हॉटेलमार्फत करण्यात आली होती. मात्र या जोडप्याला मालदीवमधील दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासामधून मदत करण्यात आली. घरी परत जायचं असेल तर तुम्हाला खसागी जेट विमानाने जावं लागेल. ज्याचा खर्च अंदाजे एक लाख चार हजार डॉलर म्हणजेच ७९ लाख रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आलं. हॉटेलनेही त्यांना ऑफऱ देत दिवसाच्या पॅकेजमध्ये कमी पैसे आकारले. मात्र असं असलं तरी या दोघांनी हनिमूनसाठी ठरवलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसे खर्च होत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी करुन ठेवलेले बचतीचे पैसेही त्यांना आता खर्च करावे लागत आहे. “आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळाली हे चांगलं आहे. मात्र यामुळे खर्चही वाढला आहे,” असं ऑलिव्हीयाने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच या दोघांना स्पीडबोटने मुख्य बेटावरील दुसऱ्या फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे. येथे या दोघांप्रमाणेच अडकून पडलेले एक डझनहून अधिक दक्षिण आफ्रिकन लोकं आहेत. या सर्वांच्या राहण्याचा खर्च स्थानिक प्रशासनकाडून केला जाणार असल्याने या जोपड्याचे पैसे नक्कीच वाचणार असून ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये १६ एप्रिलपर्यंत लॉकडाउन असणार आहे. त्यामुळे आणखीन आठवडाभर तरी त्यांना मालदीवमध्येच थांबावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 9:47 am

Web Title: coronavirus travel restrictions strand couple on honeymoon in paradise maldive scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Video: एकाच पर्यटनस्थळावर २० हजार जणांची गर्दी, निर्बंध उठवल्यानंतर चीनमध्ये उडाला गोंधळ
2 लॉकडाउन : “अन्न आणि पैसेही संपलेत, मोबाईलवर बातम्या पाहत दिवस ढकलतोय”
3 COVID 19: इटली ठरणार भारताचा भविष्यकाळ? मुक्ता बर्वेने केलेल्या पत्रवाचनाने थरकाप
Just Now!
X