19 September 2020

News Flash

त्या एका अफवेमुळे ब्रिटनमधील नागरिकच मोबाईल टॉवर्सला लावत आहेत आग

मागील २४ तासामध्ये चार ठिकाणांवरील टॉवर्सला आग लावण्यात आली

(फोटो सौजन्य: स्मार्टफोन डॉटकॉमवरुन)

ब्रिटनमध्ये कोरनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनमधील करोनाबळींची संख्या ४९३४ असून, ४७,८०६ लोक करोनाबाधित आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचा आता एका अफवेमुळे येथील नागरिकांनी मोबाईल टॉवर पेटवण्यास सुरुवात केली आहे. देशामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये मोबाईल टॉवर जाळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. फाइव्ह जी तंत्रज्ञानामुळे करोना विषाणूंचा प्रसार होत असल्याचं एक तर्क इंटरनेटवर मांडण्यात आलं आहे. याचाच आधार घेत येथे मोबाइल टॉवरमुळे करोना पसरत असल्यासंदर्भातील अफवा व्हायरल झाल्या आहेत. म्हणूनच लोकं मोबाईल टॉवर पेटवून देत आहेत.

सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार मागील २४ तासांमध्ये ब्रिटनमधील वेगवेगळ्या भागांमध्ये व्होडाफोन कंपनीच्या चार मोबाईल टॉवरला आग लावण्यात आली आहे. मात्र आग लावण्यात आलेले टॉवर हे फाइव्ह जी नेटवर्क पुरवणारे आहेत की नाही यासंदर्भात कंपनी माहिती घेत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यांपासून हे प्रकार सुरु आहेत. मागील आठवड्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बर्मिंग्हम शहरामधील टॉवर जाळत असल्याचे दिसत आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याचा तपास आता केला जात आहे. मात्र ही आग लावण्यात आल्याचे लक्षात आल्यास स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मोबाईल टॉवरला आग लावणाऱ्यांना पकडलं जाईल असं ब्रिटनमध्ये मोबाईल सेवा पुरवणाऱ्या ईई लिमीटेड या बीटी ग्रुपचा भाग असणाऱ्या कंपनीने स्पष्ट केलं आहे.

“व्हायरल व्हिडिओमध्ये जो मोबाईल टॉवर जळताना दिसत आहे त्या टॉवरच्या माध्यमातून बर्मिंग्हममधील परिसरामध्ये सेवा पुरवली जाते. या टॉवरच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून टू जी, थ्री जी आणि फो जी सेवा पुरवली जात आहे. आम्ही लवकरात लवकर हा टॉवर दुरुस्त करुन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आगीमुळे बरेच नुकसान झाल्याने यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे,” असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

ट्विटरवरही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये फाइव्ह जी नेटवर्क देणारी ऑप्टीकल फायबरचे काम करणाऱ्या इंजिनियरला एक महिला त्रास देताना दिसत आहे. “करोनाचा फैलाव होत असतानाही इंजिनियर्स का काम करत आहेत. या तंत्रज्ञानामुळे लोकांचा मत्यू होत आहे,” असं ही माहिला व्हिडिओमध्ये ओरडताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये परसरणाऱ्या करोनासाठी फाइव्ह जी तंत्रज्ञान कारणीभूत असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. चीनमधील ज्या वुहान शहरामधून करोनाचा जगभरामध्ये प्रादुर्भाव झाला आहे त्याच वुहान शहरामध्ये मागील वर्षी फाइव्ह जी सेवा विकसित करण्यात आली होती. त्यामुळेच या माध्यमातून प्रसार होत असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये केला जात आहे.

काही सेलिब्रिटींनीही फाइव्ह जीमुळे करोना पसरत असल्याच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. मात्र त्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या पोस्ट डिलीट केल्या. मात्र या व्हायरल पोस्टमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्याला समर्थन करणारे कोणतेहे शास्त्रीय कारण अद्याप सापडलेले नाही. ब्रिटनमधील फूल फॅक्ट या फॅक्टचेक साईटने ज्या भागामध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे अशा अनेक भागांमध्ये फाइव्ह जीचे नेटवर्क नसल्याचे म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी इराणचे उदाहरण दिले असून या देशामध्ये फाइव्ह जीची सेवा उपलब्ध नसूनही येथे करोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे फाइव्ह जीमुळे करोना परसतो ही केवळ अफवाच असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र भीतीमुळे लोकं या अफवेवर विश्वास ठेऊन फाइव्ह जी सेवा देणारे मोबाईल टॉवर जाळत आहेत. आधीच ब्रिटनवर करोनाचे संकट असतानाच हे असचं चालू राहिलं तर देशातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा देणारं नेटवर्कही बंद पडेल अशी भिती काही जणांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 11:27 am

Web Title: coronavirus uk cell towers torched amid bogus conspiracy theories that link 5g with coronavirus scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 अमेरिकेसमोर अभूतपूर्व संकट : करोनामुळे हाहाकार, १०८७१ जणांचा मृत्यू
2 ट्रम्प यांचा इशारा, भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील हटवले निर्बंध
3 दुसरं आर्थिक पॅकेज : मोदी सरकार कृषी, लघु-मध्यम उद्योगांसह ‘या’ क्षेत्रांना देणार दिलासा
Just Now!
X