25 May 2020

News Flash

इंदूर: हल्ल्याला न घाबरता करोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर पुन्हा ड्युटीवर रुजू

संतप्त जमावाच्या हिंसाचाराचा सामना केल्यानंतर मनात कुठलीही भीती न बाळगता इंदूरमधील डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

संतप्त जमावाच्या हिंसाचाराचा सामना केल्यानंतर मनात कुठलीही भीती न बाळगता इंदूरमधील डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ती सर्व कामे त्यांनी चालू केली आहेत.

‘आम्हाला घाबरुन चालणार नाही, ते आम्हाला परवडू शकत नाही’ असे डॉक्टर झाकीया म्हणाल्या. जमावाने ज्या भागात त्यांच्या टीमवर दगडफेक केली, तिथे त्यांनी पुन्हा काम सुरु केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

‘लोकांना त्रास सहन करावा लागतोय. करोना बाधितांना शोधून काढणे आवश्यक आहे’ असे त्या म्हणाल्या. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली असून चौघांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा काद्यातंर्गत कारवाई केली आहे अशी माहिती डीआयजी हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. अन्य आरोपींना व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून शोधून काढू असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- परिचारिकांशी गैरव्यवहार करणाऱ्या तबलिगींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई : योगी आदित्यनाथ

इंदूरमध्ये काय घडलं होतं?
इंदूरच्या टाट पट्टी बाखल भागात करोना व्हायरस संदर्भात नागरिकांची तपासणी सुरु असताना आरोग्य विभागाच्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोग्य विभागाच्या पथकावरच थेट दगडफेक केली होती. बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

सुदैवाने आरोग्य विभागाचे पथक थोडक्यात या दगडफेकीतून बचावले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. दगडफेकीच्या या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

टाट पट्टी बाखल भागात COVID-19 चे दोन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने हा भाग कोरनाच्या फैलावाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 4:21 pm

Web Title: coronavirus unfazed by attack indore doctors return to fight pandemic dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबई पाठोपाठ दिल्लीमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना ताज हॉटेल पुरवणार जेवण
2 परिचारिकांशी गैरव्यवहार करणाऱ्या तबलिगींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई : योगी आदित्यनाथ
3 आम्ही दिवे नक्की पेटवू पण मोदींनी अर्थतज्ज्ञांचं ऐकावं! चिदंबरम यांचा टोला
Just Now!
X