News Flash

मोठा दिलासा! करोना रुग्णसंख्येत २४ तासांत प्रचंड घट, मृतांची संख्या झाली कमी

२४ तासांत ७०६ रुग्णांचा मृत्यू

संग्रहित (PTI)

गेल्या काही महिन्यांपासून लाखांची दिवसागणिक लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांतील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली असून, तब्बल एक ते दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची इतकी नीच्चांकी नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच गेल्या २४ तासांत मृतांची संख्याही घटली आहे.

देशात करोना विषाणूनं जनजीवन वेठीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं केंद्र सरकारकडून लॉकडाउनची कडक अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच्या काळात रुग्णसंख्येनं मोठी उसळी घेतली होती. मात्र, आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

सोमवारीही (१२ ऑक्टोबर) करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं होतं. सोमवारी देशात ६६ हजार ७३२ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ८१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे खूप मोठ्या कालावधीनंतर इतकी प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 9:33 am

Web Title: coronavirus update india reports a spike of 55342 new covid19 cases bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बिहार विधानसभा निवडणूक; नऊ भाजपा नेत्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी
2 गायीच्या शेणापासून बनवलेली चिप कमी करणार मोबाईल रेडिएशन; कामधेनू आयोगाचा दावा
3 हाथरस प्रकरण : “तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…”; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
Just Now!
X