22 January 2021

News Flash

चांगली बातमी! देशात सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच करोना रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा कमी

२७९ जणांचा मृत्यू

संग्रहीत

वर्षाच्या सुरूवातीलाच करोनानं देशात शिरकाव केला. त्यानंतर पूर्ण वर्ष करोनाच्या मगरमिठीत गेलं. पण, आता वर्ष मावळतीकडे झुकलेलं असताना देशातील करोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर देशवासीयांना दिलासा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासात २० हजारांपेक्षाही कमी करोना रुग्ण आढळून आले आहेत.

देशात मागील २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

राज्यात २ हजार ८५४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय १ हजार ५२६ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १६ हजार २३६ वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.३४ टक्के इतका झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 10:14 am

Web Title: coronavirus update new cases low cases reported in india bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 “या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवं”
2 देशात करोना रुग्णसंख्येत घट
3 काश्मिरातील निवडणुका अभिमानास्पद -मोदी
Just Now!
X