News Flash

शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंसह १३ नेत्यांनी ३५,००० कोटींकडे वेधलं केंद्राचं लक्ष

तत्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची केली मागणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी. (संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे उडालेला हाहाकार… रुग्णांची होणारी प्रचंड हेळसांड आणि दिवसागणिक होत असलेले हजारो करोना मृत्यू… यामुळे देशातील करोनाची परिस्थिती बिकट होत चालल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची न्यायालयानेही दखल घेतली असून, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील १३ नेत्यांनी केंद्र सरकारकडे तत्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवदेनात करोना परिस्थितीसंदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. देशात करोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील आरोग्य केंद्र आणि सर्व रुग्णालयांना विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावं. त्याचबरोबर केंद्र सरकारने संपूर्ण देशात तत्काळ मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात ३५,००० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी करोना लसीकरणासाठी वापरण्यात यावा, असंही नेत्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- करोना मृत्यूचा वेग कायम! पण २४ तासांत रुग्णसंख्येत घट

विरोधी पक्षनेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या या निवेदनावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन, बसपा अध्यक्षा मायावती, फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, डी. राजा, सीपीआय(एम)चे नेते सीताराम येचुरी यांची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 10:56 am

Web Title: coronavirus updates vaccination updates all opposition parties leader demand free vaccination across the country bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भाषिक समता जपणार! विजयानंतर राज ठाकरेंचे आभार मानत एम.के. स्टॅलिन यांनी दिली ग्वाही, म्हणाले…
2 “जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो”- अदर पुनावालांचं मत
3 करोना मृत्यूचा वेग कायम! पण २४ तासांत रुग्णसंख्येत घट
Just Now!
X