News Flash

“करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत असतानाच….”, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेतील नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून अद्यापही नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेलं नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिकट होईल असं सांगितलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. एफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“आपल्या देशातील काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही चिंतेची बाब आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अजून बिकट होत जाणं जास्त दुर्दैवी आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं. “दक्षिण अमेरिकेतील अनेक भागांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अमेरिकेत करोनाचा कहर असून आतापर्यंत १ लाख ४१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशवासियांना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरा असं आवाहन केलं. “जेव्हा तुम्हाला सोशल डिस्टनसिंग पाळणं शक्य नाही तेव्हा तुम्ही मास्क वापरा असं आम्ही प्रत्येकाला सांगत आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

“तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, मात्र मास्क वापरावाच लागेल. मास्क घातल्याने फरक पडतो. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व करावं लागणार आहे. करोनावर नियंत्रण मिळवणं नाही तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. “करोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल,” असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून करोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 8:17 am

Web Title: coronavirus us president donald trump crisis to get worse before it gets better sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ऑक्सफर्डची लस कधी मिळणार? भारतीयांना पडलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर आहे…
2 चिनी विस्तारवादाला अमेरिकेची चपराक 
3 ट्रॅक्टर विक्रीत १० टक्क्यांनी वाढ
Just Now!
X