24 September 2020

News Flash

Coronavirus: डोनाल्ड्र ट्रम्प यांच्याकडून भारताचं कौतुक, म्हणाले आमच्यानंतर फक्त भारतच…

वर्ष संपण्यापूर्वी लस उपलब्ध होईल याची मला खात्री - डोनाल्ड ट्रम्प

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून दुसरा कोणताही देश जवळपासही फिरकत नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने आतापर्यंत साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून भारताने एक कोटी १० लाख चाचण्यात केल्या आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“आम्ही जवळपास साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून इतर कोणताही देश आमच्या जवळपासही नाही. एक कोटी १० लाख चाचण्यांसोबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्याही १३० कोटी आहे. आतापर्यंत चाचण्यांची संख्या पाहता आम्ही पहिल्या क्रमांकावर असून दर्जात्मक चाचणीतही आम्हीच अव्वल आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस; अदर पूनावाला यांचा दावा

“वर्ष संपण्यापूर्वी लस उपलब्ध होईल याची मला खात्री आहे आणि ती उपलब्ध झाल्यानतंर लगेचच तिचा वापरही सुरु होईल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “अमेरिकेत गेल्या सात दिवसांमध्ये करोना रुग्णसंख्या १४ टक्क्यांनी कमी झाली आहे. तसंच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सात टक्के तर मृत्यूदर नऊ टक्क्यांनी कमी झाल्याचं,” डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 12:43 pm

Web Title: coronavirus us president donald trump india stands second after us in testing sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस; अदर पूनावाला यांचा दावा
2 भारतात लस वितरण ठरवण्यासाठी टास्क फोर्सची उद्या महत्त्वाची बैठक
3 देशभरात मागील २४ तासांत ५३ हजार ६०१ करोनाबाधित, ८७१ जणांचा मृत्यू
Just Now!
X