News Flash

“चीनमधून करोना आलाय ही गोष्ट कधीच विसरणार नाही, सत्ता मिळाली तर…,” डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

ट्रम्प यांनी दिली आत्मनिर्भर होण्याची घोषणा

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनमधून करोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याचा उल्लेख केला आहे. चीनमधून करोना आलाय ही गोष्ट आपण कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जर देशातील नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी मतदान केलं तर अमिरेका चीनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. करोनानंतर आपल्यासाठी बीजिंगचं महत्त्व पूर्वीप्रमाणे राहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, “अमेरिकेची अर्थव्यवस्था अत्यंत चांगल्या स्थितीत असताना चीनमधून करोना संसर्गाचा हल्ला झाला”. पुढे ते म्हणाले की, “त्यांनी असं होऊ द्यायला नको होतं, आम्ही हे कधीच विसरणार नाही”. “आम्ही संपूर्ण देशावर बंधनं आणली होती. आम्ही लाखो लोकांचे जीव वाचवले. आता आम्ही निर्बंध शिथील केले असून नवा रेकॉर्ड केला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

आणखी वाचा- लस येण्याआधी करोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात, WHO ने व्यक्त केली भीती

करोनाच सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत दोन लाखांहून अधिक नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही करोनाचा मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

आणखी वाचा- Coronavirus: चीनच्या आपात्कालीन लसीकरण मोहिमेला WHOचा पाठिंबा

ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “जर मला अजून चार वर्ष मिळाली तर अमेरिकेला देशातील उत्पादन महासत्ता बनवणार. चीनवर अवलंबून राहणं पूर्णपणे संपवून टाकणार”. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनसोबत व्यापारी करारांवर स्वाक्षरी झाल्यानंतर काही काळातच करोना संकट निर्माण झालं होतं. या करारासाठी अमेरिका आणि चीनमध्ये जवळपास एक वर्ष चर्चा सुरु होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 4:31 pm

Web Title: coronavirus us president donald trump promise to end reliance on china sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘अलर्ट राहा, भारत अचानक हल्ला करु शकतो’, निवृत्त चिनी जनरलने बोलून दाखवली भीती
2 सुशांत सिंह आत्महत्या; “आतापर्यंत सीबीआय व ईडीला काय सापडलं कुणालाही माहिती नाही”
3 निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयनं नवं मेडिकल बोर्ड स्थापन करावं; रियाच्या वकिलांची मागणी
Just Now!
X