05 June 2020

News Flash

नरेंद्र मोदींचं नेतृत्त्व जबरदस्त, अमेरिका तुमचे उपकार विसरणार नाही – डोनाल्ड ट्रम्प

भारताकडून अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे

करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आनंदीत झाले असून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी महान नेता असल्याचं सांगितलं.

बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं कौतुक करणार त्यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कठीण काळात मित्रांकडून जास्तीत मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन संबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. हे विसरु शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्त्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार”.

अमेरिकेत करोनाचा हाहाकार
अमेरिकेत करोनाने घातलेलं थैमान वाढत चाललं असून सलग दुसऱ्या दिवशी दोन हजार लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीकडून ही माहिती देण्यात आली आहे. एकाच दिवसात १९७३ लोकांच्या मृत्यूची नोंद झाल्याने अमेरिकेतील मृतांची संख्या १४,६९५ वर पोहोचली आहे. याआधी १९३९ मृत्यूंची नोंद झाली होती. मृतांच्या संख्येत अमेरिकेने स्पेनला मागे टाकलं आहे. स्पेनमध्ये १४,५५५ मृत्यूंची नोंद आहे. इटलीत १७,६६९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 8:15 am

Web Title: coronavirus us president donald trump thanks pm narendra modi for hydroxychloroquine sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 CoronaVirus/Lockdown Update: महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू
2 टाळेबंदीचा कालावधी वाढणार!
3 जगातील बळींची संख्या ८२ हजारांवर
Just Now!
X