26 February 2021

News Flash

करोनावरील उपचारासंबधी दोन आठवड्यात ‘गुड न्यूज’, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

करोना लसीच्या मानवी चाचणीकडे लक्ष असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

संग्रहित छायाचित्र (Photo: Reuters)

करोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलेलं असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनावरील उपचारासंबंधी आपल्या प्रशासनाकडून एका चांगल्या बातमीची घोषणा करण्यात येईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. एएनआयने ही माहिती दिली.

“रोगनिवारण व औषधोपचार यांचा आदर ठेवत मी तुम्हाला सांगू इच्छितो की, पुढील काही आठवड्यांमध्ये आमच्याकडे सांगण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी असणार आहेत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अमेरिका पुढील दोन आठवड्यात काही महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

मॉर्डना कपंनीने करोना व्हायरसविरोधात विकसित केलेल्या लसीची अंतिम टप्प्याची चाचणी अमेरिकेत सुरु होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. या टप्प्यात ३० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येणार आहे. मॉर्डना कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राझेनेका आणि दोन अन्य चिनी कंपन्यांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे. मॉडर्नासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या टप्प्यात एकाचवेळी मोठया प्रमाणावर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या टप्प्यातील निकालावर बरंच काही अवलंबून असेल. यामधून लसीची नेमकी परिणामकारकता, उपयोगिता सिद्ध होईल.

आतापर्यंत जगभरातील १ कोटी ६४ लाख लोकांना करोनाची लागण झाली असून साडे सहा लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत १ लाख ४८ हजाराहून जास्त जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला असून ४३ लाख जणांना लागण झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 1:32 pm

Web Title: coronavirus us president donald trump to announce good news on covid 19 therapeutics sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रशियाकडून चीनला मोठा झटका, घातक S-400 मिसाइलचा पुरवठा रोखला
2 नेपाळ, अफगाणिस्तान या देशांनी पाकिस्तानप्रमाणेच बनावं : चीन
3 घृणास्पद : मांजरीच्या पिल्लावर बलात्कार; पाकिस्तानातली घटना
Just Now!
X