News Flash

“सर्व संबंध तोडून टाकेन”, डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा

"चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्याची कोणतीही इच्छा नाही"

करोनाने जगभरात थैमान घातलं असून अमेरिकेला खूप मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाचा फैलाव होण्यासाठी चीनला जबाबदार धरलं असून अनेकदा हे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. त्यांनी हा करोना नसून चायनीज व्हायरस आहे असंही म्हटलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनचा उल्लेख केला असून आपली सध्या चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी चीनसोबत सर्व संबंध तोडून टाकण्याचं वक्तव्य करत अप्रत्यक्ष धमकीच दिली आहे.

“माझे क्षी जिनपिंग यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण सध्या त्यांच्याशी बोलण्याची माझी कोणतीच इच्छा नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी फोक्स बिजनेस या अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. “आपण करु शकतो अशा अनेक गोष्टी आहेत. आपण त्यांच्यासोबत सर्व संबंध तोडू शकतो,” असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला असून चीनने ज्या पद्धतीने करोनाला हाताळलं आहे ते पाहता आपण प्रचंड नाराज असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प करोनाचा फैलाव अमेरिकेत वेगाने होत असल्यापासून चीनवर टीका करत आहेत. अमेरिकेत करोनामुळे आतापर्यंत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेने चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोनाचा फैलाव झाल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. तर चीनने मात्र अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 8:42 pm

Web Title: coronavirus us president donald trump warns to cut off relations with china sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसात केलेल्या घोषणा
2 दिल्लीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची हजेरी
3 मध्यमवर्गीय, मच्छीमार, फेरीवाल्यांसाठी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय
Just Now!
X