करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून अनेक नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. दरम्यान भारतात अडकलेल्या नागरिकांसाठी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. यासाठी अमेरिकेकडून तयारी सुरु करण्यात आला आहे. भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास दोन हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने तसंच अनेक विमानं रद्द करण्यात आल्याने तिथे अडकलेल्या दोन हजार नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी तयारी सुरु कऱण्यात आली आहे. यामधील दीड हजार अमेरिकन नागरिक नवी दिल्लीत आहेत. तर मुंबईत ६०० ते ७०० जण अडकले आहेत. याशिवाय ३०० ते ४०० नागरिक इतर ठिकाणी अडकल्याची भीती असून त्यांना त्यांची ओळख पटवून देण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातून व्हेंटिलेटर्सना मोठया प्रमाणावर मागणी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेंटिलेटर्ससंबंधी महत्वाची घोषणा केली आहे. “करोना व्हायरसविरोधातील लढयात आमच्या मित्र देशांना व्हेंटिलेटर्सची गरज असेल, तर तो पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांवर उपचारांसाठी अमेरिकेत व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्याच्या उत्पादनांचा वेग वाढवण्यात आला आहे. ‘आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु’ असे ट्रम्प यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus us to airlift citizens stranded in india sgy
First published on: 28-03-2020 at 15:26 IST