News Flash

करोनावरील लस ९४ टक्के प्रभावी

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

 

करोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या कंपनीने केला आहे. ही कंपनी तयार करत असलेली लस ९४ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे. एकाच आठवडय़ात लसीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे.

यापूर्वी फाइजर या कंपनीने त्यांची लस ९० टक्के प्रभावी ठरल्याचा दावा केला होता. या दोन्ही लसींच्या यशस्वीतेचा जो दावा केला जात आहे तो अपेक्षापेक्षा अधिक चांगला आहे. आजवर बहुतेक तज्ज्ञमंडळी लसींच्या ५० ते ६० टक्के यशाबाबत सांगत आले आहेत. मात्र, लसीचे वितरण सुरू करण्याआधी आणखी सुरक्षित डेटाची गरज पडणार आहे. सुरक्षित डेटा समोर आल्यानंतर नियामक मंडळाकडून मंजुरी मिळाली तर अमेरिकेत डिसेंबपर्यंत दोन करोना लसींचा आपात स्थितीत वापर केला जाऊ  शकतो.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेत वर्षांच्या शेवटी ६ कोटी डोस उपलब्ध होऊ  शकतात, तर पुढील वर्षीपर्यंत या दोन्ही लसींचे १०० कोटी डोस अमेरिकेकडे असू शकतात. हे त्यांच्या गरजेपेक्षा अधिक असेल. अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३३ कोटी आहे.

मॉडर्ना आणि फायझर दोन्ही कंपन्या बनवत असलेल्या लसी नव्या तंत्रज्ञानानुसार तयार करण्यात आल्या आहेत. मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन होज यांनी म्हटले की, आमच्याकडे अशी लस असेल ज्यामुळे करोनाचा संसर्ग थांबेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:01 am

Web Title: coronavirus vaccine is 94 per cent effective modern company claims abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तलाव आणि नदीकाठी छठपूजेवर बंदी
2 गुपकार ठरावावरून राजकीय वातावरण तापले
3 केदारनाथमध्ये अडकून पडले आदित्यनाथ, त्रिवेंद्र सिंह रावत
Just Now!
X