News Flash

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं करोना लशीच्या चाचण्या थांबवल्या; स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम

स्वयंसेवकांना साईड इफेक्ट

जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर सध्या युद्ध पातळीवर लस तयार करण्याचं काम सुरू आहे. जगभरातील अनेक कंपन्या आणि संशोधन संस्था करोना लशींवर काम करत असून, अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननंही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लशीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने करोनावर लस शोधून काढली आहे. या लशीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस करोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे.

आणखी वाचा- भारत एकापेक्षा जास्त करोना लशी वापरण्याचा विचार करतोय, पण का?

असं असतानाच अचानक जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं लशीच्या चाचण्या थांबवल्याचं वृत्त समोर आलं आहे. रॉयटर्सनं हे वृत्त दिल असून, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. करोना लशीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आलं आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, असं जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आलं आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं विकसित केलेल्या लशीचे वैशिष्टय म्हणजे करोनापासून रक्षण करण्यासाठी या लशीचा एक डोसही पुरेसा आहे. तेच मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. एक डोस पुरेसा ठरला, तर वितरणापासून अनेक गोष्टी आणखी सुलभ होऊ शकतात. कंपनीनं ६० हजार स्वयंसेवकांवर लशीच्या चाचण्या केल्या असून, या लशीचा एक डोस परिणामकारक ठरू शकतो, हे या चाचण्यांमधून दिसून आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 7:54 am

Web Title: coronavirus vaccine update covid 19 vaccine johnson johnson bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची न्यायालयात हजेरी
2 शाळा बंद असल्याने भारताला ४०० अब्ज डॉलर्सचा फटका
3 क्रयशक्तीला चालना
Just Now!
X