20 January 2021

News Flash

साखळी तुटली, तर प्रत्येकाला करोनाची लस देण्याची गरज नाही -आयसीएमआर

संचालक बलराम भार्गवा यांची महत्त्वाची माहिती

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस महत्त्वाची असल्याची चर्चा कित्येकी महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सगळ्याचंच लक्ष करोनाची लस कधी येणार, याकडे लागलं आहे. दरम्यान, अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष बलराज भार्गवा यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. देशातील करोनाची साखळी तोडण्यात यश आलं, तर प्रत्येक नागरिकाला लस देण्याची गरज पडणार नाही,” अशी माहिती भार्गवा यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा आणि केंद्रीय आरोग्य सचिव उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिवांना देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी किती वेळ लागेल याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आरोग्य सचिव म्हणाले,”मी आधी स्पष्ट करतोय की, देशभरात लसीकरण करण्यात येईल, असं सरकारनं कधीही म्हटलेलं नाही. त्यामुळे आपण केवळ वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावरच अशा वैज्ञानिक विषयांवर चर्चा करायला हवी, हे महत्त्वाचे आहे,” असं आरोग्य सचिव म्हणाले.

आरोग्य सचिवांनंतर आयसीएमआरचे भार्गवा यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,”आपले उद्देश करोनाची साखळी तोडण्याचा आहे. त्यामुळे लसीकरण लसीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असणार आहे. जर आपण गंभीर लोकांचं लसीकरण करण्यास आणि विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो, तर आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज नाही,” असं भार्गवा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

देशात आणि जगभरात करोनाच्या अनेक लशींच्या चाचण्या सुरू असून, पुढील वर्षी सुरूवातीच्या काही महिन्यात लस येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडून या माहितीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनीही गेल्या आठवड्यात करोना लशीसंदर्भात दौरा करून माहिती घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 5:55 pm

Web Title: coronavirus vaccine update icmr dg dr balram bhargava vaccinate the entire population bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 “…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं”; आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
2 ‘तुमच्या राजकारणासाठी हा चारा नाही’, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेंदीनी जस्टिन त्रुडोना सुनावलं
3 सुनावणीदरम्यान उघड्याबंब व्यक्तीला स्क्रीनवर पाहून सर्वोच्च न्यायालयाचा संताप; म्हणाले..
Just Now!
X