News Flash

लस करोनाचं संक्रमण थांबवेलच, याची खात्री नाही; ‘फायझर’च्या विधानानं गोंधळ

भारतात लवकरच लस येण्याची शक्यता

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच देशांना लसीचे वेध लागले आहेत. लस निर्मितीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच फायझर बायोएनटेकच्या लसीने सगळ्यांना आशेचा किरण दाखवला आहे. फायझरची लस उपलब्ध झाली आहे. ब्रिटनने आणि बहारीननं फायझरच्या लसीच्या वापरासाठी परवानगी दिली असून, ऐन लसीकरणाच्या तयारीत असतानाच फायझरच्या सीईओंनी केलेल्या विधानानं संभ्रम निर्माण झाला आहे.

फायझर बायोएनटेकच्या लसीला ब्रिटननं काही दिवसांपूर्वी परवानगी दिली. ब्रिटनबरोबरच बहारिननंही लसीच्या वापराला परवानगी दिली. ब्रिटनकडून लसीकरणाची तयारी सुरू असतानाच फायझर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एनबीसीच्या लेस्टर हॉल्ट यांना दिलेल्या मुलाखतीत फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी ही माहिती दिली. लसीकरणानंतरही एखाद्या व्यक्तीद्वारे करोनाचं संक्रमण होऊ शकत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना बोर्ला म्हणाले, हे खात्रीने सांगू शकत नाही. मला वाटतं, याचं परीक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला जे माहिती आहे, त्याआधारावर संक्रमणाविषयी काहीही खात्रीने सांगू शकत नाही,” असं बोर्ला म्हणाले.

भारतात वापरासाठी मागितली आहे परवानगी

फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनन सरकारनं फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्याचबरोबर बहारिनमध्येही लस वापरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. लसीची आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केलेल्या अर्जात मागितली आहे. नवीन औषधी व क्लिनिकल चाचणी नियम २०१९ नियमांतंर्गत सध्या सुरू असलेल्या चाचण्यामधून सूट देऊन अशा प्रकारची परवानगी देण्याची विशेष तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फायझर इंडियाने ४ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. या लसीचा भारतात आपातकालीन स्थितीत वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे फायझरने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 5:20 pm

Web Title: coronavirus vaccine update uk ready for roll out but pfizer ceo not certain if vaccine stops transmission bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आमचं न ऐकल्यानेच पेच निर्माण झाला; शरद पवारांनी मोदी सरकारला सुनावले खडेबोल
2 ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा; शेतकऱ्यांबरोबर उतरणार रस्त्यावर
3 करोनावरील लस लवकरच भारतात?; फायझरने मागितली DCGI कडे परवानगी
Just Now!
X