News Flash

विडी कामगाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले २ लाख रुपये; म्हणाला, ‘मी विड्या वळून…’

या व्यक्तीच्या खात्यात उरले केवळ ८५० रुपये

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण देशात आढळून येत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला आहे. मात्र अशातही काही सकारात्मक बातम्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि करोनाविरुद्धच्या लढाईला बळ देणाऱ्या ठरत आहेत. अशीच एक बातमी केरळमधील कुन्नूरमधून समोर आली आहे. येथील एका विडी कामगाराने मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीसाठी तब्बल दोन लाख रुपयांची मदत केली आहे. एवढा निधी दिल्यानंतर या कामगाराच्या खात्यात केवळ ८५० रुपये शिल्लक उरले आहेत. हा विडी कामगार नक्की कोण यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आली नसली तरी मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजचजण त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

शनिवारी सायंकाळी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी ट्विटरवरुन या व्यक्तीचं कौतुक केलं. “मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करणाऱ्यांच्या अनेक कथा समोर येत आहेत. खात्यावर २ लाख ८५० रुपये असताना त्यापैकी दोन लाख रुपये मदतनिधीला देणाऱ्या वयस्कर व्यक्तीची गोष्टही समोर आली आहे. हे आपलं एकमेकांबद्दल असणारं प्रेमच आपल्याला इतरांहून वेगळं बनवतं. पुन्हा एकदा सर्वांचे आभार,” असं ट्विट विजयन यांनी केलं आहे.

संबंधित विडी कामगाराने बँकेकडे दोन लाख दान करण्यासंदर्भातील माहिती दिली तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. सुरुवातीला बँकेतील कर्मचारी मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये पैसे वळवण्यासंदर्भात विचार करत होते. या विडी कामगाराला तुझी आर्थिक परिस्थिती ठीक नसताना एवढं मोठी रक्कम का देत आहे असं विचारल्यानंतर त्याने मी अजूनही विड्या वळून जगण्यासाठी पैसे कमवू शकतो, असं सांगितलं. तसेच आपण दिव्यांग असल्याने आपल्याला पेन्शनची रक्कम मिळत असल्याचेही या व्यक्तीने सांगितल्याचं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनीही रविवारी या विडी कामगारासंदर्भातील ट्विट केलं आहे. “केरळसमोर लसीकरणाचं आव्हान आहे. कुन्नुरमधील विडी कामागाराने दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान करत स्वत:च्या खात्यावर केवळ ८५० रुपये ठेवलेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हे पैसे वळवून घेण्यासंदर्भात शंका होती. मात्र या कामगाराने मी विड्या वळून पोटापाण्यासाठी कमाई करु शकतो, तसेच मला दिव्यांग पेन्शन मिळतं असं सांगितलं. लोकांनी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत,” असं थॉमस म्हणाले आहेत.

केरळमध्ये हजारो लोकांनी मुख्यमंत्री मदतनिधीसाठी पैसे देण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारला लसीकरणासाठी थेट निर्मात्यांकडून लसी घ्याव्या लागणार असल्याने हजारो लोकांनी समोरुन पुढाकार घेत शक्य त्या पद्धतीने मुख्यमंत्री साहय्यता निधीमध्ये पैसे जामा करत आहेत. अनेकांनी या विडी कामागाराचे ट्विटरवरुन कौतुक केलं आहे.

“This is Kerala. I hope we can hear many more heartwarming stories in the coming days. We will win against Covid because Kerala shows their humanity in every crisis,” a Twitter user wrote.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

केरळमधील लोकांबरोबर केरळबाहेर राहणाऱ्या पण मूळचे केरळमधील असणाऱ्या लोकांनी पैसे देण्यास सुरुवात केल्याने मुख्यमंत्री निधीमध्ये ५० लाखांचा निधी काही दिवसात जामा झालाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 11:19 am

Web Title: coronavirus viral story kerala beedi worker donates rs 2 lakh to cm relief fund scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Corona: भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट; साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण तर २८१२ रुग्णांचा मृत्यू
2 Coronavirus : गुगल भारताला करणार १३५ कोटींची मदत; सुंदर पिचाईंनी केली घोषणा
3 करोना संकटात भारताला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
Just Now!
X