लॉकडाउन असतानाही दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पोलिसांनी ३२ वर्षीय व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण कऱण्यात आली. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. लाल स्वामी असं या व्यक्तीचं नाव असून तो हावडा येथील रहिवासी आहे.

लाल सिंह दूध आणण्यासाठी घऱाबाहेर पडले होते. यावेळी गर्दी झाल्याने पोलिसांना केलेल्या लाठीचार्जमध्ये ते जखमी झाले असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. लाल सिंह यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी मात्र ह्दय बंद पडल्याने हा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांना आधीपासून हदयासंबंधी त्रास जाणवत होते असं त्यांनी सांगितलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत करोनाचे १० रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ६६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं असून हे पश्चिम बंगामधील १० वी केस आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीने कुठेही परदेशात प्रवास केलेला नाही. नुकतंच त्यांनी एका लग्नात हजेरी लावली होती. तिथे त्यांना करोनाची लागण झाली असल्याचा संशय आहे. सध्या त्यांना आणि कुटुंबाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन जाहीर केलं आहे.