28 September 2020

News Flash

Coronavirus: तो एकाच वेळी पाच जणींना बाईकवर घेऊन फिरत होता आणि मग….

सरकारने सांगितलं Social Distancing पाळा, मात्र...

जगभरामध्ये सध्या करोनाने थैमान घातलं आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे दहा हजारहून अधिक जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे. तर लाखो लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनमधील वुहान प्रांतामधून करोनाचा विषाणूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे. आता या विषणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमधील सरकारे सार्वजनिक ठिकाणी कमी गर्दी व्हावी या दृष्टीने निर्णय घेत आहेत. भारतामध्येही अनेक शहरे आणि संपूर्ण जिल्हे लॉकडाउन करण्यात आले आहेत. अनेक देशामध्ये सोशल डिस्टन्सींग म्हणजेच बाहेर न भटकता घरात थांबवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र अनेकजण अद्यापही निर्बंध झुगारुन सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहे. असंच एख प्रकरण चीनमध्ये समोर आलं आहे.

चीनमधील एका व्यक्तीला इलेक्ट्रीक स्कुटरवरुन पाच मुलींना घेऊन जात असल्याच्या गुन्ह्याआखाली अटक करण्यात आली आहे. चीनमध्ये मोठ्याप्रमाणात करोनाचा प्रादूर्भाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर तेथे नागरिकांना गटागटाने फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही अटक करण्यात आलेला लूओ नामक व्यक्ती त्याच्या इलेक्ट्रीक बाईकवर एकाच वेळी पाच तरुणींना घेऊन फिरताना अढळला.

‘मेल ऑनलाइन’ने दिलेल्या वृत्तानुसार या इलेक्ट्रीक बाईकवरील कोणत्याच व्यक्तीने खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घातलेलं नव्हतं. हे सहाजण एकाच बाईकवरुन गुआंगडाँग प्रांतामधील डाँग्युयॉग येथे मोकाटपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत फिरत होते.

नक्की वाचा >> गाडीमध्ये सेक्स करताना अढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

अटक करण्यात आल्यानंतर लूओने या मुली मला दुकानामध्ये भेटल्या आणि तिथेच त्यांनी मला लिफ्ट देण्याची विनंती केली असा दावा केला आहे. परवाना नसताना गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणे, हेल्मेट न घालता गाडी चालवणे तसेच अनधिकृत कंपनीची बाईक वापरणे अशा चार गुन्ह्यांखाली लूओला अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 4:36 pm

Web Title: coronavirus what social distancing chinese man carries five women on electric scooter all six arrested scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 CoronaVirus : जोफ्रा आर्चरने सहा वर्ष आधीच केलेलं भाकित?
2 Coronavirus: गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई
3 Coronavirus: घरी बसून कंटाळलेल्या व्यक्तीने बनवले ‘करोना भजी’; नेटकरी झाले सैराट
Just Now!
X