News Flash

Coronavirus: शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा

शाळा सुरु करण्यासाठी घाई न करण्याचा WHO चा सल्ला

ऑक्सफर्डची लस यशस्वी ठरल्याचे कौतुक करतानाच अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे असे मायकल रायन यांनी म्हटले आहे. (Photo Courtesy: Reuters)

करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली असून शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे. रॉयटर्नसे यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. तसंच शाळांना राजकारणात आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एकदा करोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात असं त्यांनी सांगितलं आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल.

“…तर करोना महामारी अजून गंभीर रुप धारण करेल”, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

करोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल अशी भीती टेड्रोस यांनी व्यक्त केली असून इशाराही दिला आहे.

करोना संसर्ग अद्यापही लोकांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे,” असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. जिनिवा येथे करोनासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “जर मुलभूत नियमांचं पालन केलं नाही तर महामारी गंभीर, गंभीर आणि अतीगंभीर रुप धारण करेल,” असं टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि ब्राझिलला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 9:33 am

Web Title: coronavirus who urge countries not to make schools into a political football sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “आमच्याकडून अधिक कर घ्या”, करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी अतिश्रीमंत व्यक्तींचा पुढाकार
2 “मला वाटतं मी चूक केली”… करोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी हेच ठरले त्याचे शेवटचे शब्द
3 “चालक थकलेला होता आणि तितक्यात गाडीसमोर…”; दुबे प्रकरणातील कार अपघातासंदर्भात पोलिसांचे स्पष्टीकरण
Just Now!
X