07 August 2020

News Flash

करोनिल औषधावरुन बाबा रामदेव आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर दाखल

रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होत असल्याचा दावा

योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

मंगळवारी बाबा रामदेव यांनी समारंभपूर्वक करोनिल औषधाचे लाँचिंग केले. “करोनावर १०० टक्के लागू होणारं औषध आणि ७ दिवसांत करोना बरा होईल,” असा दावाही रामदेव बाबा यांच्या पतंजलीने केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच करोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात करोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे. बाबा रामदेव आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्ताला ज्योति नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ सुधीर कुमार उपाध्याय यांनी दुजोरा दिला. बलराम जाखर यांनी हा एफआयआर नोंदवला आहे.

“वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिलला कधी करोनाचं औषध म्हटलंच नाही”
दरम्यान, शुक्रवारी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. “आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या करोनाचं औषध म्हटलं नाही,” असं आचार्य बालकृष्ण म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 9:26 am

Web Title: coronil fir against ramdev 4 others in jaipur over coronavirus medicine claim dmp 82
Next Stories
1 “वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिलला कधी करोनाचं औषध म्हटलंच नाही”
2 सीमेवर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली नाही तर भारतही जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार
3 Good News : १२ दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला
Just Now!
X