News Flash

Coronavirus: देशातली रुग्णसंख्या तीन लाखांच्या घरातच! गेल्या २४ तासात ३,७८० मृतांची नोंद

बाधितांची एकूण संख्या २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांत नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या आसपासच आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासात देशात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

कालच्या तुलनेत या संख्येत थोडी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता बाधितांची एकूण संख्या २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

नव्या बाधितांसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येते. गेल्या २४ तासात ३७८० मृतांची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा २ लाख २६ हजार १८८ वर पोहोचली आहे. तर देशातला मृत्युदर १.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात सध्या ३४ लाख ८७ हजार २२९ रुग्ण उपचाराधीन आहेत. काल दिवसभरात ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आता देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

देशात लसीकरणाचा वेगही वाढताना दिसत आहे. काल दिवसभरात १४ लाख ८४ हजार ९८९ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली. त्यामुळे आता लसीकरण झालेल्यांची संख्या १६ कोटी ४ लाख ९४ हजार १८८ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 11:56 am

Web Title: corornavirus in india total cases active cases and death toll details vsk 98
Next Stories
1 बंगालची सूत्रं तिसऱ्यांदा ममतांकडे! मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
2 Maratha Reservation : आरक्षण रद्द, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
3 करोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्रातून २२,०१२ कोटींचा जीएसटी केंद्राच्या तिजोरीत
Just Now!
X