News Flash

भ्रष्टाचारी मंत्र्यांना फाशीच दिली पाहिजे: अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल प्रकरणाकडे रोख?

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

“भ्रष्टाचारी मंत्र्यांना फाशी दिली पाहिजे. माझी ही आधीपासूनची भूमिका आहे” असं सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांची भ्रष्टाचाराविरूध्दची ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या बोलण्याचा रोख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे होता की नाही हे सांगणं त्यांनी टाळलं पण त्यांचे एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे बोल होते हे नक्कीच.

सोमवारी एएनआयशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, भ्रष्टाचारी मंत्र्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही माझी आधीपासूनची भूमिका आहे. हजारेंच्या या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहे. हजारेंनी थेट केजरीवालांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख केजरीवाल यांच्या दिशेनेच होता अशी चर्चा रंगली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेल्या कपिल शर्मा यांनी दोन कोटी रूपये घेतल्याचा आरोप केला होता.  या आरोपांवर रविवारी हजारेंनी प्रतिक्रिया दिली होती. या आरोपांनी मला दु:ख झाल्याचे अण्णा हजारेंनी म्हटले होते.

“मी गेली ४० वर्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला आहे. मी आणि अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आहोत. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’मुळेच अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले. पण आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. माझ्याकडे शब्दच नाहीत.” असं ते म्हणाले होते.

दरम्यान दिल्लीचे माजी जलमंत्री कपिल मिश्रा यांनी हे आरोप केल्यानंतर हे प्रकरण अँटी करप्शन ब्यूरोकडे गेले आहे. माझ्याकडील सर्व पुरावे पोलिसांना दिल्याचे मिश्रांनी सांगितले होते. भ्रष्टाचारविरोधी मोहीमेत अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये मतभेद झाले होते. अरविंद केजरीवालांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण अण्णा हजारे पक्ष स्थापन करण्यास अनुकूल नव्हते. अण्णा हजारेंनी यापूर्वीही अनेकदा केजरीवालांवर टीका केली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 10:55 pm

Web Title: corrupt ministers should be hanged says anna hazare
Next Stories
1 विजय सत्याचाच होणार; भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केजरीवाल यांनी मौन सोडले
2 केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या कपिल मिश्रांची ‘आप’मधून हकालपट्टी
3 मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा आता इफ्तार पार्टीमधल्या बीफसेवनाला विरोध
Just Now!
X