News Flash

इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम; आज अंतराळात पाठवणार १० सॅटलाईट

PSLV-C49 ची ही ५१ वी मोहीम असणार आहे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यावर्षीचं पहिलं सॅटलाईट आज लाँच करणार आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून १० सॅटलाईट लाँच केली जाणार आहेत. आज दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी ही सॅटलाईट अवकाशात झेपावतील. इस्रोनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पोलर सॅटलाईट लाँच वेहिकलची (PSLV-C49) ही ५१ वी मोहीम असणार आहे. याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून आणि ९ इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे.

EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालिन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात येणार आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना

श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावण्याची योजना नाही.

लाँच दरम्यान ज्या ठिकाणाहून लाँचिंग पाहता येतं ती गॅलरी बंद ठेवण्यात येणार आहे.

या लाँचिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. सर्वांना ते इस्रोच्या वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 2:21 pm

Web Title: countdown for the launch of pslvc49 eos01 mission commenced today isro gave information jud 87
Next Stories
1 भाजपा खासदार साक्षी महाराज करोना पॉझिटिव्ह
2 धक्कादायक : तीन वर्षीय चिमुकल्यासह महिलेने १७ व्या मजल्यावरून मारली उडी
3 “आम्ही जिंकणार,” बायडेन यांनी व्यक्त केला विश्वास; व्हाईट हाऊसमध्ये तयारी सुरु
Just Now!
X