News Flash

काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान एकाकी, भारताची बाजू भक्कम

एकही देश पाकिस्तानचे या अहवालावरून समर्थन करण्यासाठी पुढे आलेला नाही. उलट अनेकांनी हा अहवाल प्रसिद्ध होण्याची वेळ आणि त्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली

संग्रहित छायाचित्र

काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल भारताबरोबरच इतर सहा देशांनीही फेटाळला आहे. भारताला मिळत असलेल्या समर्थनामुळे भारताची बाजू भक्कम झाली असून पाकिस्तान एकाकी पडल्याचे चित्र संयुक्त राष्ट्रात दिसत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने एकही देश पुढे आलेला नाही.

काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून तिथे सीरियासारखी परिस्थिती झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र हा अहवाल एका खास हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भारताने केला होता. भारताची हीच री सहा देशांनी ओढली आहे. अशिया खंडातून भुतान, अफगाणिस्तान, आफ्रिका खंडातून मॉरिशअस, युरेशियातून बल्गेरिया आणि लॅटिन अमेरिकेतील क्युबा आणि व्हेनुझुएला या सहा देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे.

काश्मिरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन-भारताने झिडकारला संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

विशेष म्हणजे एकही देश पाकिस्तानचे या अहवालावरून समर्थन करण्यासाठी पुढे आलेला नाही. उलट अनेकांनी हा अहवाल प्रसिद्ध होण्याची वेळ आणि त्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली आहे.

या ४९ पानी अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन तसेच नियंत्रण रेषेवर अत्याचार, सुरक्षा दलांची भूमिका याचा उल्लेख आहे. तेथील परिस्थिती चांगली नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

परंतु, भारताने हा दावा फेटाळताना हा अहवाल तयार करताना वापरण्यात आलेली माहिती संकलनाची पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता आणि उलट तपासणी न करता ही माहिती जमा केली आहे. हा अहवाल अत्यंत एकतर्फी आणि पूर्वग्रह दूषित असल्याचे त्यांनी म्हटले.

भूतानचे प्रतिनिधी किंग्या सिंघये यांनीही हा अहवाल फेटाळताना दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याचा उल्लेख अहवालात नसल्याचे दाखवून दिले. तसेच या अहवालावरून संयुक्त राष्ट्राने कोणतीही कृती करू नये अशी विनंतीही केली आहे. या अहवालाला राजकीय गंध येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर देशांच्या प्रतिनिधींनीही भारताची बाजू घेत अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. भारताला वाढत असलेले समर्थन पाकिस्तानसाठी अडचणीचे ठरत आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्य फारूक अमिल यांनी जम्मू-काश्मीरसाठी एक चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतीय प्रशासनाने याबाबत योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणीही अमिल यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 4:04 pm

Web Title: countries across continents support india on kashmir at un report pakistan lonely
Next Stories
1 जम्मू-काश्मीरच्या भाजप प्रदेशाध्याला पाकिस्तानातून धमक्या?
2 दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी बोलले म्हणून मारले गेले-गुलजार
3 काश्मीरमध्ये सरकार कोसळले पण आमदारांना ‘अच्छे दिन’, जाणून घ्या कसे ते…
Just Now!
X