देशातील करोनाबाधितांची संख्या शनिवारी ९०.५० लाखांवर पोहोचली, तर करोनातून ८४.७८ लाख जण बरे झाले आहेत. त्यामुळे करोनातून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या ९० लाख ५० हजार ५९७ इतकी असून, दिवसभरात ४६ हजार २३२ रुग्ण आढळले. तर ५६४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ७२६ वर पोहोचली आहे.

देशात सध्या चार लाख ३९ हजार ७४७ उपचाराधीन रुग्ण असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ४.८६ टक्के इतकी आहे.