28 September 2020

News Flash

भिंतीवर ५००-५०० च्या नोटा चिटकवून कुटुंबाने केली सामूहिक आत्महत्या

आठव्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या

सामूहिक आत्महत्या

उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराच्या भिंतीवरच आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या आत्महत्येनंतर अंत्यसंस्काराचा खर्च कोणाला करावा लागू नये म्हणून भिंतीवर ५००-५०० च्या नोटाही चिटकवण्यात आल्या होत्या. या नोटांखाली हे पैसे आमच्या अंत्यसंस्कारासाठी वापार असं लिहिण्यात आलं होतं.

गुलशन वासुदेव असं आत्महत्या करणाऱ्या कुटुंबप्रमुखाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्यवसायामधील तोटा आणि नातेवाईकांनीची विश्वासघात केल्याने वासुदेव कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पत्नीच्या मदतीने त्यांनी मुलगा ऋतिक आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी आपल्या मोठ्या मुलीसहीत आठव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यासंदर्भात भिंतीवर लिहीलेल्या मजकुरामध्ये राकेश वर्मा यासाठी जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. राकेश हा गुलशन यांचा मेहुणा असल्याची माहिती समोर आली आहे. राकेशने आपल्या भावाची फसवणूक केल्यानेच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचा आरोप गुलशन यांचा सख्खा भाऊ असणाऱ्या हरीश यांनी केला आहे. जीन्स कपड्यांच्या धंद्यामध्ये आपली दोन कोटींची फसवणूक झाली असून यासाठी राकेशच जबाबदार असल्याचे वासुदेव कुटुंबाने लिहिलेल्या आत्महत्येच्या मजकुरामध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 4:15 pm

Web Title: couple commits suicide after allegedly killing their children in ghaziabad with 500 rs on wall scsg 91
Next Stories
1 असं केल्याने बलात्कार थांबतील का?; ज्वाला गुट्टाचा थेट सवाल
2 स्वसंरक्षणासाठी आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद
3 पोक्सोंतर्गत दयेच्या याचिकेची तरतूद नको : राष्ट्रपती
Just Now!
X