दिल्लीतील फतेहपूरबेरी पोलीस स्टेशन हद्दीतील एका जोडप्याने गरीबीमुळे आपल्या सहा दिवसाच्या मुलाला ३ लाख ६० हजार रूपयांना विकले. जेव्हा आईला मुलाची आठवण आली तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाचे पालक, दोम खरेदीदार आणि अन्य दोघांनी अटक केली आहे. खरेदीदार जोडपे मुलाला बिहारमध्ये घेऊन जात होते. कानपूर, यूपी पोलिसांच्या मदतीने कानपूर रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून पकडण्यात आले.

गोविंद कुमार आणि त्यांची पत्नी पूजा देवी आया नगरमध्ये राहतात आणि चे मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी आपल्या सहा दिवसांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार केली होती. मात्र पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. गोविंदकुमारने त्याचा मित्र हरिपाल सिंग याने मुलाचे अपहरण केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तपास केला तर ८ जूनला मुलाचा जन्म झाला होता आणि त्याच्या पालकांनी १५ जूनला तक्रार दिली.  त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी एका ताब्यात घेतले. तर गोविंद कुमार आणि त्यांची पत्नी पूजा देवी यांनी त्यांचे मित्र रमण यादव यांच्या नातेवाईकाला मुलाला विकल्याचे उघड झाले.

हेही वाचा- येमेन : मुलींची हत्या करणाऱ्या वडिलांना भर चौकात जाहीर मृत्यूदंड; AK 47 ने गोळीबार करत दिली शिक्षा

गर्भातच झाला होता सौदा

रमण यादव यांचे नातेवाईक विद्यानंद आणि रामपरी यादव यांच्या लग्नाला २५ वर्ष झाली होती. दोघांनाही मूल झाले नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी रमन यादव यांना मुलं खरेदीबद्दल सांगितले. रमण यादव यांनी हरिपाल यांना सांगितले. हरिपालने सांगितले की एक गरीब जोडपे आहे आणि ते आपल्या मुलाला विकायला तयार आहे. ज्यावेळी सौदा झाला तेव्हा मुलाचा जन्म झाला नव्हता. अशा परिस्थितीत मुलगा असेल तर ते विकत घेण्याचे ठरले. मुलाला खरेदी करण्याचा सौदा ३ लाख ६० हजारावर झाला. गुरुग्राममधील नारायण हॉस्पिटलमध्ये पूजाने ८ जून रोजी मुलाला जन्म दिला. १० जूनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. यासाठी विद्यानंद यांनी बिहारमधील आपल्या गावातील जमीन विकली होती. मुलाच्या पालकांनी १२ जून रोजी मुलाला विद्यानंद आणि त्याची पत्नी यांना दिले होते.