News Flash

लग्नानंतर चार वर्षांनी गावी परतलेल्या जोडप्याची दगडाने ठेचून हत्या

आंतरजातीय विवाह केल्यानंतर चार वर्षांनी गावी परतलेल्या जोडप्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

आंतरजातीय विवाह केल्यानंतर चार वर्षांनी गावी परतलेल्या जोडप्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. कर्नाटकच्या गडंग जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. हॉनर किलिंगच्या या प्रकरणात मुलीने कुटुंबियांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केले होते.

चार वर्षांपूर्वी रमेश आणि गंगम्माने लग्न केले होते. दोघेही वेगळया समाजातील असल्यामुळे गंगम्माच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आपल्या विवाहावर कुटुंबियांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची भिती असल्यामुळे दोघेही लाक्कालाकट्टी गाव सोडून पळून गेले.

कर्नाटकातील विविध ठिकाणी ते मजूर म्हणून काम करायचे. बुधवारी रमेश आणि गंगम्मा दोघेही आपल्या मूळगावी परतले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला नंतर दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. आमचा तपास सुरु आहे. या टप्प्यावर आम्ही तपासाची प्रगती उघड करणार नाही असे गजेंद्रगड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या जोडप्याला दोन मुले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 11:22 am

Web Title: couple stoned to death in karnataka four years after inter caste marriage dmp 82
Next Stories
1 नोटाबंदीची तीन वर्षे: जाणून घ्या त्या दिवशी नक्की काय घडलं आणि त्याचे काय परिणाम झाले
2 दोन दिवसात BSNL च्या २२ हजार कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
3 अयोध्येत ३० बॉम्ब निकामी पथके तैनात
Just Now!
X