27 January 2021

News Flash

भररस्त्यात ‘टल्ली’ जोडप्याकडून अश्लिलतेचा हायव्होल्टेज ड्रामा

दोघांना अटक करण्यात आली

गुरूग्रामच्या रस्त्यावर बुधवारी सकाळी नशेत असलेल्या प्रेमी जोडप्याकडून अश्लिलतेचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दोघांनी रस्त्यावरच अश्लिल कृत्य करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी शेजारणीच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून तिला उठवलं. शेजारची महिला बाहेर आली असता या दोघांनी तिच्यासमोरच पुन्हा अश्लिल कृत्य करण्यास सुरूवात केली, तिच्या घराच्या समोरच दोघांनी चाळे करण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता या दोघांनी त्या महिलेसोबतही अश्लिल कृत्य केलं. अखेर महिलेने पोलिसांना फोन करुन बोलावलं आणि दोघांना अटक करण्यात आली.

एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, येथील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या सेक्टर-15 मध्ये ही घटना घडली. तक्रारकर्त्या महिलेनुसार, सकाळी जवळपास 5 वाजेच्या सुमारास कोणीतरी त्यांचा दरवाजा जोरजोरात वाजवला. सातत्याने दरवाजा वाजवत असल्याने त्या बाहेर आल्या. तेव्हा आपल्या शेजारी राहणारी तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत होती. दोघंही नशेत झिंगलेले असल्याचं तिच्या लक्षात आलं. ते दोघं रस्त्यावरच अश्लील चाळे करत होते. महिलेने विरोध केला असता दोघांनी त्या महिलेसोबतच अश्लिल चाळे करण्यास सुरूवात केली. त्यावर महिलेने आरडाओरडा केला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या जोडप्याला ताब्यात घेतलं. दोघांना अटक करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरुणाची रवानगी तुरूंगात झाली असून तरुणीला जामिन मिळाल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 9:31 am

Web Title: couples obscene act on road arrested
Next Stories
1 VIDEO: वर्दीतला देवमाणूस; महिला प्रवाशाचे वाचवले प्राण
2 फेकन्युज : ‘ते’ छायाचित्र भलतेच!
3 उगाच बाहेरच्यांनी येऊन आम्हाला शिकवू नये, आफ्रिदीच्या वक्तव्यावर सचिनचा संताप
Just Now!
X