News Flash

INX Media case : चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत २ सप्टेंबरपर्यंत वाढ

अधिक चौकशीसाठी चिदंबरम यांना या प्रकरणातील इतर आरोपींसमोर नेण्याची गरज असल्याचे यावेळी सीबीआयने कोर्टाला सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत २ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. सीबीआयने कोर्टाकडे चिदंबरम यांची आणखी पाच दिवसांची कोठडी मागितली होती.

कोर्टात सुनावणीदरम्यान सीबीआयने सांगितले की, चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत ते फिरुन फिरुन एकसारखीच उत्तरं देत आहेत. अधिक चौकशीसाठी या प्रकरणातील इतर आरोपींसमोर त्यांना नेण्याची गरज आहे. तर दुसरीकडे चिदंबरम यांच्या वकीलांनी सांगितले की, त्यांना सीबीआयकडून ४०० प्रश्न विचारण्यात आले आहेत. दरम्यान, कोर्टाने सीबीआयला म्हटले की, आपण दररोज पाच दिवसांची कोठडी का मागत आहात? एकाच वेळी १५ दिवसांची कोठडी का मागितली नाही.

यापूर्वी २६ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांच्या कोठडीत ४ दिवसांनी वाढ करण्यात आली होती. ही कोठडीची मुदत आज संपणार होती. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर आज पुन्हा त्यांच्या कोठडीत तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे येत्या २ सप्टेंबरला कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, गुरुवारी सुप्रीम कोर्टाचे न्या. आर. भानुमती आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, ते भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या कोठडीत रवानगी करण्याच्या कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकेवर २ सप्टेंबर रोजी सुनावणी करतील. त्यानंतर चिदंबरम यांच्या वकिलांनी स्वतः सांगितले होते की, चिदंबरम २ सप्टेंबरपर्यंत कोठडीतच राहू इच्छित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 4:30 pm

Web Title: court further extends the cbi remand of p chidambaram till 2nd september in connection with inx media case aau 85
Next Stories
1 “मेजर ध्यानचंदना भारतरत्न द्या म्हणून सरकारकडे भीक मागणार नाही”
2 ITR भरण्याची तारीख वाढवलेली नाही; बनावट परिपत्रकावर प्राप्तिकर विभागाचे स्पष्टीकरण
3 नासाचे प्रमुख म्हणतात, ‘प्लुटो ग्रहच, मला शाळेतही हेच शिकवलंय’
Just Now!
X