28 October 2020

News Flash

राडिया यांच्या संभाषणाची ध्वनिफीत न्यायालयाच्या नोंदीवर घेण्याची सीबीआयची मागणी फेटळाली

माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांचे ध्वनिफितीमधील संभाषण न्यायालयाच्या नोंदीवर घ्यावे यासाठी सीबीआयने केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

| July 13, 2013 06:52 am

माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांचे ध्वनिफितीमधील संभाषण न्यायालयाच्या नोंदीवर घ्यावे यासाठी सीबीआयने केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
सीबीआयने आरोपीला काही दस्तऐवज अद्यापही उपलब्ध करून दिलेला नसल्याने सीबीआय आपल्या याचिकेबद्दल गंभीर नाही असे स्पष्ट होते, असे नमूद करून विशेष सीबीआय न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी सदर याचिका फेटाळली.
याचिकेतील परिशिष्ट ए बचाव पक्षाला उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने अर्ज अपूर्ण आहे त्यामुळे सदर ध्वनिफीत न्यायालयाच्या नोंदीवर घेता येणार नाही.
बचाव पक्षाला ते परिशिष्ट उपलब्ध करून देण्यात आले नाही कारण त्यामध्ये अन्य काही घटकांचा समावेशसून ते जाहीर करणे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिताचे नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यू. यू. लळित यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 6:52 am

Web Title: court refuses to put radia tape on record
Next Stories
1 इंडोनेशियातील कारागृहातून कैदी पसार
2 राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत
3 छे ! ‘ती’ला ओळखतही नव्हतो!
Just Now!
X