11 August 2020

News Flash

टेरीचे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांना न्यायालयाचे समन्स

लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेऊन समन्स काढण्यात आले.

| May 15, 2016 01:51 am

आर.के पचौरी

द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया म्हणजे टेरी या संस्थेचे माजी प्रमुख आर. के.पचौरी यांना दिल्ली न्यायालयाने लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी म्हणून समन्स पाठवले आहे. माजी सहकारी महिलेचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेऊन समन्स काढण्यात आले.
आर. के. पचौरी यांच्याविरोधात कारवाईसाठी पुरेसे पुरावे भादंवि कलम ३५४ ए, ३५४ बी, ३५४ डी, ५०९, ३४१ अन्वये उपलब्ध आहेत. त्यामुळे आरोपी आर. के. पचौरी यांनी पुढील तारखेला म्हणजे ११ जुलैला उपस्थित राहावे असे महानगर दंडाधिकारी शिवानी चौहान यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी १ मार्च रोजी पचौरी यांच्यावर लैंगिक छळ ३५४ ए, कलम ३५४ बी (महिलेवर बळजबरी करून हल्ला), कलम ३५४ डी (मागावर असणे), कलम ५०९ (हावभावातून विनयभंग), कलम ३४१ (बेकायदेशीर स्थानबद्धता) असे आरोप आहेत. आरोपपत्र आम्ही पाहिले असून, आरोपी पचौरी यांनी सदर तक्रारदार महिलेशी अनेकदा लैंगिक टिप्पणी करून तिला अयोग्य स्पर्शही केला होता. महिलेची संमती नसताना त्यांनी तिला बाजूने स्पर्श केला. तिला अयोग्य एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवले. आरोपपत्रात २३ साक्षीदार फिर्यादी पक्षाने दिले आहेत. त्यात काही विद्यमान तर काही माजी कर्मचारी आहेत. पचौरी यांना गेल्या वर्षी २१ मार्चला अटकपूर्व जामीन मिळाला होता. गेल्या वर्षी तेरा फेब्रुवारीला त्यांच्यावर कलम ३५४, ३५४ (ए), कलम ३५४ (डी) (विनयभंग) व कलम ५०६ (धमकावणे) या आरोपानुसार प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे एफआयआर दाखल करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2016 1:51 am

Web Title: court summons rk pachauri as accused in sexual harassment case
Next Stories
1 अमेरिकी काँग्रेसच्या नऊ समित्यांच्या अध्यक्षांचा ट्रम्प यांना पाठिंबा
2 अणुनिशस्त्रीकरण भित्तिपत्रक स्पर्धेत अंजली चंद्रशेखर यांना तृतीय पुरस्कार
3 फिकट निळ्या दीर्घिकेच्या माध्यमातून महाविस्फोट सिद्धांतावर संशोधन
Just Now!
X