25 November 2020

News Flash

११३ वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तिचा जन्मदाखला देण्याचा कोर्टाचा महापालिकेला आदेश

सत्र न्यायालयाने महापालिकेला ११३ वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तिचा जन्मदाखला देण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाचं म्हणजे आता ही व्यक्ति हयात नाहीय.

उत्तर गुजरातमधील पालनपूर येथील सत्र न्यायालयाने महापालिकेला ११३ वर्षांपूर्वी जन्मलेल्या व्यक्तिचा जन्मदाखला देण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाचं म्हणजे आता ही व्यक्ति हयात नाहीय. लिऑन जीरोमी फेलीसियो डिसूझा यांचा ११ एप्रिल १९०५ रोजी उत्तर गुजरातच्या पालनपूर येथे जन्म झाला. पण पालनपूर महापालिकेकडे त्यांच्या जन्माची कुठलीही नोंद नाहीय. लिऑन डिसूझा यांचे ३७ वर्षांपूर्वी गोव्याहून अहमदाबादच्या दिशेने येत असताना मुंबईमध्ये अपघाती निधन झाले.

मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा मुलगा फेड्रिक फेलिक्स डिसूझा (६०) यांनी महापालिकेकडे लिऑन यांचा जन्म दाखला जारी करण्याची विनंती केली. फेड्रिक यांच्या २८ वर्षीय मुलीला फ्रान्समध्ये उच्च शिक्षणासाठी जायचे आहे. त्यासाठी त्यांनी लिऑन यांच्या जन्मदाखल्याची मागणी केली आहे. माझ्या मुलीकडे पोर्तुगीज पासपोर्ट असेल तर तिला युरोपियन युनियनमध्ये जे देश आहेत त्या देशांमध्ये शिक्षणासाठी सवलत मिळेल. १९६० च्या आधी ज्यांचा जन्म गोव्यामध्ये झाला आहे त्यांना पोर्तुगालचे नागरीकत्व मिळते.

माझ्या आईचा पॅट्रीसियाचा जन्म १९१९ साली गोव्यामध्ये झाला. तिचा जन्म दाखला माझ्याकडे आहे. पण ती गोव्याची वंशज आहे हे सिद्ध होण्यासाठी लिऑन यांचा जन्मदाखला सुद्धा आवश्यक आहे. पण पालनपूर महापालिकेकडे त्यांच्या जन्माची कुठलीही नोंद नाही. मागच्या पाच महिन्यापासून सुरु असलेल्या सुनावणीमध्ये डिसूझा कुटुंबाने लिऑन यांचा पालनपूरमध्ये झाल्याचा सिद्ध करणारी १५ कागदपत्रे दिली होती.

मागच्या आठवडयात कोर्टाने पालनपूरच्या मुख्य अधिकाऱ्याला जन्मदाखला जारी करण्याचे आदेश दिले. डिसूझा कुटुंबाने पुरावा म्हणून लिऑन यांचा शाळेचा दाखला कोर्टाला सादर केला. त्यांनी चौथी ते आठवीपर्यंत पालनपूर येथील शाळेत शिक्षण घेतले अशी माहिती डिसूझा कुटुंबाचे वकिल सलीम बागबान यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2018 4:08 pm

Web Title: court tells civic body to issue birth certificate to person who born 113 years ago
टॅग Court
Next Stories
1 महागाई वाढणार? पेट्रोलचा नवा उच्चांक, डिझेल सत्तरीपार
2 हार्दिक पटेल यांची सुरक्षा हटवली
3 शीख बेईमान, हाफिज सईदचा मेहुण्याने शिखांच्या पहिल्या गुरुंचा केला अपमान
Just Now!
X