News Flash

‘कोव्हॅक्सिन’च्या चाचण्या  मुलांवर करण्याची शिफारस

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती.

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशीच्या चाचण्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर करण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे. या चाचण्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील असणार आहेत.

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लशीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली. भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. सविस्तर चर्चेनंतर समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची शिफारस करणार आहे. लशीच्या मुलांवर चाचण्या करण्यावर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती त्या वेळी कंपनीला सुधारित वैद्यकीय चाचण्या संचालन प्रक्रिया सादर करण्यास सांगण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:37 am

Web Title: covacin tests recommended for children akp 94
Next Stories
1 उत्तर प्रदेशात गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांची संख्या ५२ वर
2 करोनाच्या चिंताजनक विषाणूला ‘भारतीय उपप्रकार’ म्हणणे चुकीचे!
3 बी.१.६१७ विषाणूचा ४४ देशात फैलाव
Just Now!
X