07 July 2020

News Flash

CoronaVirus : लॉकडाउन लांबणार?; राज्यांच्या मागणीवर केंद्र सरकारचं विचारमंथन सुरू

सरकारी सूत्रांची माहिती

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये करोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लॉकडाउन वाढवणं गरजेचं असल्याचं सरकारला म्हटलं होतं. या मागणीवर सरकारनं विचार सुरू केला असून, १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाउन वाढण्याची दाट शक्यता आहे.

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन घोषित केला होता. लॉकडाउनला १४ दिवस पूर्ण झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाउनच्या काळात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती करोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. लॉकडाउन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलगांना, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारनं आधीच लॉकडाउन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन वाढवणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, अनेक राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाउन वाढवण्याच्या मागणीवर विचार करण्यात येत आहे. “अनेक राज्यांनी आणि तज्ज्ञांनी ही मागणी केली आहे. त्यादृष्टीनं केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात विचार करत आहे,” असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 5:41 pm

Web Title: covid 19 centre thinking of extending lockdown after april 14 bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 देशभरात ३५४ नवे करोनाग्रस्त, रुग्णसंख्या ४ हजार ४२१
2 CoronaVirus : “अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल, लोकांचे जीव गेले तर ते कसे परत आणणार”
3 करोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मोठी योजना, सांगितला 5T प्लान
Just Now!
X